Join us

Video: माँ की ममता! 'जग जिंकून आलेल्या' रोहित शर्माला जेव्हा माऊली जवळ घेते तेव्हा...

Rohit Sharma mother emotional moment Video: वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मा आला त्याच वेळी तो आई-वडिलांना भेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:54 IST

Open in App

Rohit Sharma mother emotional moment Video: भारतीय संघाने तब्बल १३ वर्षांनी वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाने टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी संयमी कामगिरी करत सात धावांनी विजय मिळवला आणि १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी२० विश्वचषकाची ट्रॉफी मायदेशी आणली. भारतीय संघाने गुरूवारी भारतात आल्यानंतर आधी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत येऊन चाहत्यांच्या गराड्यात जल्लोष साजरा केला. या कार्यक्रमानंतर रात्री वानखेडे मैदानावर टीम इंडियाचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी रोहित शर्माची आपल्या आईशी खूप दिवसांनी भेट झाली. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मरिन ड्राइव्हवरील विजयी मिरवणूक पार पडल्यानंतर रोहित शर्मा आणि कंपनी वानखेडे मैदानात आली. त्यांनी वर्ल्डकपची ट्रॉफी BCCIला सुपूर्द केली. तर टीम इंडियाला जाहीर झालेली १२५ कोटींच्यी बक्षिसाची रक्कम असलेला धनादेश BCCIने रोहितकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमानंतर रोहित शर्मा वानखेडे मैदानातच आपल्या आई-वडिलांना भेटला. बऱ्याच दिवसांनी आपल्या लेकाला पाहून रोहितच्या आईला राहावलं नाही. त्याने मायेने आपल्या लेकाला जवळ घेतले. यावेळचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, रोहितने वानखेडेवर झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी मुंबईकरांच्या स्पिरीटचे कौतुक केले. "मुंबई कधीही निराश करत नाही. आमचे जोरदार स्वागत झाले. संघाच्या वतीने आम्ही चाहत्यांचे आभार मानतो. विजयानंतर आता मला खूप आनंद वाटतो आहे. सर्वात खास क्षण तो होता जेव्हा भारतीय कर्णधार म्हणून मी T20 विश्वचषक उंचावला. फायनलमध्ये शेवटचे षटक टाकल्याबद्दल आणि भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल हार्दिक पांड्याचेही विशेष कौतुक. शेवटचे षटक टाकल्याबद्दल त्याला सलाम. त्यासोबतच मुंबईकरांनाही सलाम. त्यांच्या प्रेमाने आम्हाला आणखी चांगली कामगिरी करण्याचे बळ मिळाले," असे रोहित शर्मा म्हणाला.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघसोशल मीडिया