Roger Binny Steps Down Rajeev Shukla Becomes Acting BCCI President : भारतीय क्रिकेट संघात बदलाचे वारे वाहत असताना BCCI च्या प्रशासकीय कारभारातही मोठा बदल झाला आहे. वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटर रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर आता उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे कार्यवाहू अध्यक्ष झाले आहेत, अशी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने यासंदर्भात अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजीव शुक्लांच्या अध्यक्षतेखाली पार पडली BCCI ची बैठक
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी एपेक्स काउंसिलची बैठक पार पडली. या बैठकीत रॉजर बिन्नी यांच्या जागी राजीव शुक्ला हेच अध्यक्षपदी होते. ड्रीम इलेव्हनसोबतचा करार संपुष्टात आल्यावर टीम इंडिच्या नव्या स्पॉन्सरशिपसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचा उल्लेखही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. पण आता प्रश्न पडतो की, रॉजर बिन्नी यांनी राजीनामा देण्यामागचं कारण काय? यामागे तसं कोणतही ट्विस्ट नाही. बीसीसीआयच्या नियमानुसारच, हा बदल घडल्याचे दिसून येत आहे.
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
BCCI अधक्षपद भुषवणण्यासंदर्भातील नियम काय? रॉजर बिन्नींना का सोडावी लागली खुर्ची?
बीसीसीआयच्या घटनेनुसार, वयाच्या ७० व्या वर्षींपर्यंतच एखादी व्यक्ती BCCI चे अध्यक्षपद बजावू शकते. वयाची ही मर्यादा ओलांडल्यावर कार्यकाळ शिल्लक असला तरी त्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागतो. १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या बिन्नी यांचा जन्म १९ जुलै १९५५ मध्ये कर्नाटक येथे झाला. त्यांचे वय सध्या ७० वर्षे आणि ४१ वर्षे इतके आहे. त्यामुळे नियमानुसार, ते BCCI च्या अध्यक्षपदी कायम राहण्यास अपात्र होते. हेच त्यांच्या राजीनाम्यामागचे कारण आहे.
रॉजर बिन्नी यांनी ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सौरव गांगुलीनंतर बीसीसीआयचा कारभार हाती घेतला होता. ते भारतीय क्रिकेट नियमामक मंडळाचे ३६ वे अध्यक्ष ठरले.
Web Title: Roger Binny Steps Down Rajeev Shukla Becomes Acting BCCI President Claims Media Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.