Join us

पंतनं सांगितलं द्रविड अन् गंभीरच्या कोचिंगमधील अंतर; गौती भाई अधिक...

पंतनं  सध्याचा भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर आणि आधीचा कोच राहुल द्रविड या दोघांमधील अंतर काय? यावर आपलं मत व्यक्त केले आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 10:51 IST

Open in App

भारताचा स्टार बॅटर आणि विकेट किपर रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीला लागला आहे. सध्या तो दुलिप करंडक स्पर्धेतही खेळताना दिसतोय. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्याआधी पंतनं  सध्याचा भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर आणि आधीचा कोच राहुल द्रविड या दोघांमधील अंतर काय? यावर आपलं मत व्यक्त केले आहे.  

गंभीरनं घेतलीये द्रविडची जागा, सुरुवात दमदार, पण धक्काही बसला!

टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर गौतम गंभीरनं त्याची जागा घेतली.  गंभीर कोच झाल्यावर भारताने पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळली. श्रीलंका दौऱ्यावर टी-२० मालिकेत भारतीय संघाने सहज विजय मिळवला. पण वनडेत टीम इंडियाला ०-२ अशा फरकाने फरकाने मालिका गमावण्याची वेळ आली होती. हा गंभीरला कोचिंगच्या सुरुवातीला एक धक्काच होता. 

गंभीर-द्रविडच्या कोचिंगवर पंत नेमकं काय म्हणाला?

दुलिप करंडक स्पर्धेच्या पहिल्या मॅच आधी रिषभ पंतने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये द्रविड आणि गंभीर यांच्यासंदर्भात भाष्य केले. तो म्हणाला की, मला वाटते की, राहुल भाई  व्यक्ती आणि कोच दोन्हीमध्ये संतुलित होता. कोणत्याही क्रिकेट संघाचा प्रवास हा चढ-उतारांचा सामना करत पुढे सरकत असतो. क्रिकेटमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही घटना घडत असतात. अशा वेळी तुम्हाला कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे, ती दिशा दाखवण्याच काम कोच करत असतो. पंत नव्या कोचबद्दल म्हणाला की, गौती भाई अधिक आक्रमक आहे. आपल्याला जिंकायच आहे, याबाबतीत तो एकतर्फी विचार करणारा आहे.  

पंतच्या दुलिप कंरडक स्पर्धेतील कामगिरीवर नजरा 

अपघातीस गंभीर दुखापतीनंतर क्रिकेटपासून दूर गेलेला पंतनं मर्यादीत षटकांच्या सामन्यातून दमदार कमबॅक केले आहे. आता दुलिप कंरडक स्पर्धेत धमक दाखवून पुन्हा टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. पंत या देशांतर्गत स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना दिसतोय. पहिल्या डावात त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. इंडिया ए विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात तो अवघ्या ७ धावांवर बाद झाला.   

टॅग्स :रिषभ पंतराहुल द्रविडगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ