Rinku Singh Was Surprised After Selection For Asia Cup Team India Squad : युईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेआधी टीम इंडियातील मॅच फिनिशर रिंकू सिंह याच्या भात्यातून वादळी खेळी पाहायला मिळाली. UP T 20 लीगमधील शतकी खेळीसह त्याने आगामी स्पर्धेतील टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील आपली दावेदारी भक्कम केलीये. पण तुम्हाला माहितीये का? या खेळीआधी रिंकू सिंहच्या मनात एक भीती होती. पण सरप्राइज मिळालं अन् या पठ्ठ्याला शतक मारण्याचं बळ मिळालं. खुद्द रिंकू सिंह यानेच यासंदर्भातील खास गोष्ट शेअर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सरप्राइज मिळालं अन्श तकी खेळी करण्याचं बळ आलं
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी तगडी स्पर्धा आहे. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यर आणि यशश्वी जैस्वाल (राखीवमध्ये असला तरी मुख्य संघात स्थान मिळणं कठीण) यांनाही संघात स्थान मिळालेले नाही. पण रिंकूचा मात्र नंबर लागलाय. आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियात वर्णी लागेल, याची आशाच नव्हती. पण BCCI नं या बॅटरला सरप्राइज दिलं. यामुळे त्याला शतकी खेळीचही बळ मिळालं.
सिक्सर किंग युवीचा चेला पांड्या अन् सूर्या पेक्षा भारी! ९ चेंडूत एक षटकार मारतोच; इथं पाहा रेकॉर्ड
नेमकं काय म्हणाला रिंकू सिंह?
रेवस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, रिंकू सिंह म्हणाला की, 'आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यामुळे प्रेरणा मिळाली. मागच्या वर्षात मी चांगली कामगिरी केलेली नाही. त्यामुळे या स्पर्धसाठी संघात जागा मिळणार नाही, असे वाटत होते. पण निवडकर्त्यांनी माझ्यावर भरवसा दाखवला. त्यामुळे आत्मविश्वास उंचावला अन् मी युपी टी-२० लीगमध्ये मोठी खेळी करू शकलो. अशीच कामगिरी आशिया कप स्पर्धेतही करण्यास उत्सुक आहे, असे रिंकूनं म्हटलं आहे.
संघात एन्ट्री झाली, आता प्लेइंग इलेव्हनची लढाई
रिंकू सिंह याने आतापर्यंत ३३ सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व केले आहे. हातून गेलेला सामना एकहाती वळवण्याची क्षमता दाखवून देत त्याने अल्पावधीत क्रिकेटमध्ये आपली खास छाप सोडलीये. UP T-20 लीगमध्ये १६८ धावांचा पाठलाग करताना मेरठ मारवेरिक्स संघाचे नेतृत्व करताना रिंकू सिंह याने फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून देत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यावर या खेळीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्रीचा मार्गही सुकर होण्यास मदत मिळेल. ही लढाई जिंकून तो किती सामन्यात खेळताना दिसणार तेही पाहण्याजोगे असेल.
Web Title: Rinku Singh Was Surprised By His Selection In Asia Cup Was Not Expecting It Due To Poor Performance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.