Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा

गौतम गंभीर-रोहित शर्मा यांच्यात वाद? ड्रेसिंगरुममध्ये नेमकं काय घडलं?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:03 IST

Open in App

वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कमबॅकसह भारतीय संघाने वनडे मालिकेत विजय सलामी दिली. रांचीच्या मैदानात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने १७ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हिट शो पाहायला मिळाला. दोघानी दुसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची तगडी भागीदारी रचली. मैदानातील दोघांच्या कामगिरीची चर्चा रंगत असताना आता रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गौतम गंभीर-रोहित शर्मा यांच्यात वाद?  सोशल मीडियावर ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात रोहित शर्मा आणि गौतम गंभीर कोणत्या तरी विषयावर  चर्चा करताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव आणि रोहित शर्मानं कोच गंभीरसमोर  दिलेली संतप्त रिअ‍ॅक्शनमुळे दोघांच्यात वाद झाल्याचा अंदाज लावला जात आहे. पण जर हा व्हिडिओ नीट पाहिला तर दोघांच्या सामन्यातील एखाद्या गोष्टीवर चर्चा रंगल्याचे दिसते. रोहित शर्मा हातवारे करून शॉट सिलेक्शनबद्दल काही तरी बोलतो अन् निराजनक प्रतिक्रिया देताना दिसते.  

मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video

टीम इंडियातील स्टार खेळाडू आणि कोच यांच्यात सगळ काही ठिक नाही?  का रंगू लागलीये अशी चर्चा 

भारतीय संघाने WTC च्या चौथ्या चक्राला सुरुवात करण्याआधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. दोन्ही स्टार खेळाडूंना संघाबाहेर करण्यात गंभीरचा हात आहे, अशी चर्चा रंगली. एवढेच काय तर वनडेतूनही त्यांचा पत्ता कट करण्यासाठी कोच प्रयत्नशील आहे, अशी चर्चा रंगत आहे. टीम इंडियाच्या टी-२० आणि कसोटी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वकाठी ठिक आहे, पण वनडे संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये वरिष्ठ खेळाडू आणि कोचमध्ये तणावपूर्ण वातावर आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओकडे लोक वादाच्या पार्श्वभूमीतून पाहत आहेत.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघदक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मागौतम गंभीर