RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद

RCB Yash Dayal in trouble, UP Crime News: बंगळुरू संघाला जिंकवून दिली IPL फायनल, पण आता बलात्कार प्रकरणात अडकल्याने यश दयालची कारकीर्द धोक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:50 IST2025-08-10T11:47:46+5:302025-08-10T11:50:39+5:30

whatsapp join usJoin us
RCB Yash Dayal banned in UP T20 League due to minor girl rape case upca decision | RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद

RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB Yash Dayal in trouble, UP Crime News: तब्बल १८ वर्षांच्या कालावधीनंतर IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपद मिळाले. RCBच्या विजयात डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याची मोलाची भूमिका होती. पण त्यानंतर गोलंदाज यश दयालवर सुरु झालेली संकटे कमी होताना दिसत नाहीयेत. बलात्कार प्रकरणात अडकलेल्या यश दयालची कारकीर्द आता धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. यश दयालवर १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला अटकेचा धोका निर्माण झाला आहे. याचदरम्यान,  त्याला एका मोठ्या लीगमधून वगळण्यात आले आहे.

बड्या स्पर्धेतून यश दयाल बाहेर

मिळालेल्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज यश दयालला UP T20 League मध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. यूपी क्रिकेट असोसिएशन (UPCA) ने हा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज पुढील हंगामात खेळू शकणार नाही. जयपूरच्या सांगानेर पोलिस ठाण्यात यश दयालविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर यूपीसीएने हा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, यूपी टी२० लीगमधील गोरखपूर लायन्सने यश दयालला ७ लाख रुपयांना खरेदी केले होते, परंतु आता तो या लीगमध्ये खेळू शकणार नाही.

यश दयालला उच्च न्यायालयाचा मोठा झटका

बलात्कार प्रकरणात यश दयालला राजस्थान उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने या प्रकरणात त्याची अटक आणि पोलिस कारवाई स्थगित करण्यास नकार दिला होता. न्यायालयाने म्हटले होते की हा खटला अल्पवयीन मुलीशी संबंधित आहे, त्यामुळे स्थगिती देता येणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल.

यशचा पाय आणखी खोलात

यश दयाल विरुद्ध पहिला गुन्हा गाझियाबादमध्ये दाखल करण्यात आला होता. यश दयालने गाझियाबादमधील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे सांगण्यात आले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात यश दयालच्या अटकेला स्थगिती दिली होती. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला जयपूरमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी राजस्थान उच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला.

Web Title: RCB Yash Dayal banned in UP T20 League due to minor girl rape case upca decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.