RCB vs DC, WPL Final 2026 : कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स आणि लॉरा वॉल्व्हार्डच्या दमदार खेळीसह अखेरच्या षटकात शिनेल हेन्रीनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने WPL च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासमोर निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०३ धावा करत RCB च्या संघासमोर विक्रमी २०४ टार्गेट सेट केले आहे. याआधी WPL च्या फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा मुंबई इंडियन्सच्या नावे होते. गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने १४९ धावांचा बचाव करत ट्रॉफी जिंकली होती. यंदाच्या हंगामात RCB ला ट्रॉफी जिंकण्यासाठी विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करावा लागेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जेमिमा रॉड्रिग्जची दमदार खेळी, अर्धशतकासह लुटली मैफिल
स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर लिझेल ली आणि शेफाली वर्मा या जोडीनं
दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. शेफाली १३ चेंडूत २० धावा आणि लिझेल ली ३० चेंडूत ३७ धावा करुन माघारी फिरल्यावर
जेमिमा रॉड्रिग्जनं ३७ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ५७ धावांची दमदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेणारी खेळी केली.
WPL 2026 Orange Cap Race : MI बाहेर पडल्यावरही हरमनप्रीतचा रुबाब! स्मृतीला नंबर वन होण्याची संधी, पण...
अखेरच्या षटकात लॉरासह हेन्रीचा जलवा
जेमिमा रॉड्रिग्जच्या दमदार खेळीनंतर अखेरच्या षटकात लॉरा आणि शिनेल हेन्री हिने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. लॉरानं २५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४४ धावांची दमदार खेळी केली. रिचा घोषनं तिला धावबाद केले. शेनल हेन्रीनं १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटाकाराच्या मदतीने २३३ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढताना ३५ धावांची खेळी करत दिल्ली कॅपिटल्सच्या धावफलकावर २०३ धावा लावल्या.