Ravindra Jadeja Iconic Sword Celebration After Scoring Half Century छ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ब्रिस्बेन गाबा कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी रवींद्र जडेजानं अर्धशतक साजरे केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या दोन सामन्यात जड्डूला बाकावर बसवण्यात आले होते. आधी वॉशिंग्टन सुंदर, मग आर अश्विन यांना संधी दिल्यावर तिसऱ्या सामन्यात जड्डूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. या संधीच त्यानं सोनंही करून दाखवलं. जिथं आघाडीचे फलंदाजा अडखळत खेळत स्वस्तात तंबूत परतले तिथं जड्डूनं आश्वासक खेळी करून दाखवली.
इथं पाहा जड्डूचं आयकॉनिक 'तलवारबाजी' सेलिब्रेशन
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात रवींद्र जडेजानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील २२ वे अर्धशतक साजरे केले. यासाठी त्याने ८२ चेंडूचा सामना केला. दबावात अर्धशतकाला गवसणी घातल्यावर जड्डूची तलवारबाजी सेलिब्रेशनही पाहायला मिळाले. जड्डूच्या भात्यातून ज्या ज्या वेळी मोठी अन् दमदार खेळी येते त्यावेळी तो बॅटनं तलवारबाजी करतात तसे बॅट फिरवत आनंद व्यक्त करतो. फंलदाजीतील ताकद वाढवण्याच्या इराद्यानेच या अष्टपैलू खेळाडूल प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते.
अर्धशतकी खेळी आणखी पुढे नेत हा डाव साधण्याचे चॅलेंज
'तलवारबाजी'सह जड्डूनं अर्धी लढाई जिंकली आहे. पण युद्ध अजून संपलेले नाही. ऑस्ट्रेलियानं मजबूत पकड मिळवलेल्या सामन्यात सामना पराभव टाळायचा असेल तर जड्डूला ही खेळी आणखी मोठी करावी लागेल. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघानं ६ बाद १८० धावा केल्या होत्या. जडेजा ८८ चेंडूत ५२ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला नितीश कुमार रेड्डी २६ चेंडूत ९ धावांवर नाबाद आहे. दोघांच्यातील मजबूत भागीदारीसह भारतीय संघ आधी फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी २४६ धावांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नशील असेल. हा आकडा गाठला तर भारतीय संघाला हा सामना अनिर्णित राखण्याकडे झुकवणं सहज सोप होईल.