बीसीसीआयनं १९ वर्षांखालील तिरंगी मालिकेसाठी मंगळवारी भारत 'अ' आणि भारत 'ब' संघाची घोषणा केली. बंगळुरुमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या दोन संघांसह अफगाणिस्तानच्या १९ वर्षाखालील संघाचा समावेश आहे. या मालिकेत राहुल द्रविडच्या लेकालाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. पण या दोन्ही संघातून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यंवशी यांचे नाव 'गायब' आहे. इथं जाणून घेऊयात त्यामागचं कारण आणि या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघासह स्पर्धेतील सामने कुठं आणि कधी खेळण्यात येणार आहेत त्यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हैदराबादकराच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवताना दिसणार द्रविडचा मुलगा
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय द्रविड आगामी अंडर १९ स्पर्धेत भारत 'ब' संघाकडून विकेट किपर बॅटरच्या रुपात खेळताना दिसेल. त्याच्या खांद्यावर विकेटमागील कामगिरीसह सर्वोत्तम फलदाजीसह संघासाठी दुहेरी जबाबदारी बजावण्याची जबाबदारी असेल. या संघाचे नेतृत्व एरॉन जॉर्ज करणार असून अभिज्ञान कडू याच्याकडे संघाचे उप कर्णधारपद देण्यात आले आहे. अंडर १९ तिरंगी मालिकेत भारत 'अ' संघाचे नेतृत्व हे पंजाबच्या विहान मल्होत्राकडे देण्यात आले आहे. यावर्षी इंग्लंड U19 विरुद्ध दोन युथ टेस्टमध्ये त्याने २७७ धावा केल्या होत्या.
वैभव सूर्यंवशीसह आयुष म्हात्रेचं नाव एकाही U19 संघात नाही, कारण...
मुंबईकर आयुष म्हात्रे हा सध्या रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळत आहे. याशिवाय १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा कतार येथील दोहा येथे आयोजित २३ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग आहे. ही हिट जोडी अन्य स्पर्धेत व्यग्र असल्यामुळेच १९ वर्षांखालील तिरंगी मालिकेत त्यांची नावे दिसत नाहीत.
कधी अन् कुठ रंगणार या स्पर्धेतील लढती?
भारत U19 'अ', भारत U19 'ब' आणि अफगाणिस्तान U19 संघातील तिरंगी मालिकेतील लढती या बंगळुरु स्थित BCCI सेंटर ऑफ एक्सीलन्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. १७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल.
भारत U19 अ संघ :
विहान मल्होत्रा (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार/विकेटकीपर), वफी कच्छी, वंश आचार्य, विनीत V.K., लक्ष्य रायचंदानी, ए. रापोल (विकेटकीपर), कनिष्क चौहान, खिलान ए पटेल, अनमोलजीत सिंह, मोहम्मद एनां, हेनिल पटेल, आशुतोष महिदा, आदित्य रावत, मोहम्मद मलिक.
भारत U19 'ब' संघ :
एरोन जॉर्ज (कर्णधार), वेदांत त्रिवेदी (उपकर्णधार), युवराज गोहिल, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, हरवंश सिंह (विकेटकीपर), अन्वय द्रविड (विकेटकीपर), आर.एस. अंबरीश, बी.के. किशोर, नमन पुष्पक, हेमचुदेशन जे, उद्धव मोहन, ईशान सूद, डी दीपेश, रोहित कुमार दास.