IND A vs BAN A Women's Asia Cup Rising Stars 2026 Final : राधा यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने महिला आशिया कप राइझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेशला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. २०२३ च्या पहिल्या हंगामातही भारतीय संघाने बांगलादेशला शह दिला होता. आता पुन्हा एकदा तोच सिलसिला कायम राखत भारतीय संघाने दुसऱ्या हंगामही जिंकून दाखवला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पहिल्यांदा फलंदाजी करताना तेजल हसबनीस ५१ (३४)*आणि राधा यादव ३६ (३०) आणि वृंदा दिनेश १९ (१७) यांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारतीय महिला 'अ' संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १३४ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना गोलंदाजीत प्रेमा रावत हिने भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय सोनिया तनुजा यांनी प्रत्येकी २-२ तर सायमा, मिनू मनी आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत बांगलादेशच्या संघाला ८८ धावांत गारद करत अंतिम सामन्यात ४६ धावांनी विजय नोंदवत सलग दुसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी उंचावली.
बांगलादेशच्या संघाकडून चौघींनी दुहेरी आकडा गाठला, पण....
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाकडून चौघींनी दुहेरी आकडा गाठला. पण यातील एकीलाही मोठी खेळी करता आली नाही. शमिमा सुल्तान हिने १६ चेंडूत केलेल्या २० धावा या बांगलादेशच्या संघाकडून कोणत्याही बॅटरनं केलेली सर्वोच्च खेळी ठरली. तिच्याशिवाय शर्मिन सुल्तान हिने २९ चेंडूत १८ धावा, सादिया अख्तरने १५ चेंडूत १० धावा तर कर्णधार फहिमा खातून हिने ११ चेंडूतील १४ धावा केल्या.
पहिल्या हंगामात श्रेयंका पाटीलनं सोडली होती खास छाप
युवा महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेकडून २०२३ पासून रायझिंग स्टार्स स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या हंगामातही भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातच फायनल झाली होती. श्वेता शेरावतच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघाला पहिली ट्रॉफी जिंकून देण्यात कनिका अहुजाने फायनलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच ठरली होती. या हंगामात श्रेयंका पाटील प्लेयर ऑफ सीरिज ठरली होती. जी सध्या भारतीय वरिष्ट महिला संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Web Summary : India A defeated Bangladesh A in the Women's Asia Cup Rising Stars final, securing their second consecutive title. Tejal Hasabnis and Radha Yadav starred with the bat, while Prema Rawat led the bowling attack. India won by 46 runs.
Web Summary : भारत ए ने महिला एशिया कप राइजिंग स्टार्स के फाइनल में बांग्लादेश ए को हराकर लगातार दूसरा खिताब जीता। तेजल हसबनीस और राधा यादव ने बल्ले से शानदार प्रदर्शन किया, जबकि प्रेमा रावत ने गेंदबाजी में कमाल दिखाया। भारत ने 46 रनों से जीत दर्ज की।