India A Women vs Bangladesh A Women, Final, ACC Women's Asia Cup Rising Stars 2026 : थायलंड येथील बँकाॅकच्या टर्डथाई क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि बांगलादेश महिला 'अ' संघात जेतेपदासाठीचा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. भारताची कर्णधार राधा यादव हिने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पण आघाडीच्या चौघी स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतल्यामुळे टीम इंडियाची अवस्था बिकट झाली. ४४ धावांवर ४ विकेट्स पडल्या असताना पुण्याची लेक आणि मध्यफळीतील भरवशाची बॅटर तेजल हसबनीस हिने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली. संघ अडचणीत असताना ती नाबाद अर्धशतकी खेळीसह टीम इंडियाचा 'कणा' झाली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तेजलची आश्वासक अर्धशतकी खेळी अन्....
तेजलनं ३४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी करत भारताच्या डाव सावरणारी खेळी केली. तिच्याशिवाय राधा यादवनं केलेल्या ३० चेंडूतील ३६ धावांच्या जोरावर भारतीय संघाने जेतेपदासाठीच्या लढतीत निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १३४ धावा करत बांगलादेशसमोर १३५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.
शिखर धवनची 'सेकंड इनिंग'! ४०व्या वर्षी पुन्हा विवाहबद्ध, सोफी शाईनशी बांधली लग्नगाठ (PHOTOS)
कोण आहे तेजल हसबनीस?
तेजल हसबनीसस हिचा जन्म १६ ऑगस्ट १९९७ रोजी पुण्यात झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती महाराष्ट्र आणि पश्चिम विभाग संघाचे प्रतिनिधीत्व करते. या संघाकडून खेळताना तिने मधल्या फळीतील भरवशाची बॅटर असल्याचे सिद्ध करून दाखवत भारतीय महिला संघातही पदार्पण केले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिने जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवरुन भारतीय महिला संघाकडून आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सध्याच्या घडीला ती भारतीय 'अ' संघाकडून मैदानात उतरली आहे. बांगलादेशविरुद्ध ती संघासाठी संकटमोचक होऊन मैदानात तग धरून उभारली. तिने पुन्हा एकदा आपल्यातील क्षमता दाखवून सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
गोलंदाजीत बांगलादेशच्या कर्णधाराने साधला ४ विकेट्सचा डाव
महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील फायनलमध्ये नंदीनी कश्यप आणि वृंदा दिनेश या दोघींनी भारताच्या डावाची सुरुवात केली. नंदीनी १५ चेंडूत ८ धावांवर बाद झाली. या स्पर्धेत कमालीची कामगिरी करणारी वृंदाने १७ चेंडूत १९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर तेजल आणि राधा यादवशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून कर्णधार फहिमा खातून हिने सर्वाधिक ४ विकेट्सचा डाव साधला. याशिवाय फर्जाना आणि फतेमा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.