Join us
Daily Top 2Weekly Top 5

PSL 2026 Final: ॲरन हार्डीची अष्टपैलू कामगिरी; बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पेशावर झल्मीने उंचावली ट्रॉफी

सॅम अयूब एकटा पडला, मार्नस लाबुशेनसह ग्लेन मॅक्सेवल सपशेल अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 03:01 IST

Open in App

Babar Azam's Peshawar Zalmi To Win PSL 2026 Title : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मी संघाने पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. रविवारी लाहोर येथील गद्दाफीच्या स्टेडियमवर मार्नस लाबुशेन याच्या नेतृत्वाखालील हैदराबाद किंग्समनला एकतर्फी मात देत पेशावर झल्मीनं दुसऱ्यांदा ही स्पर्धा गाजवली. अंतिम सामन्यात कर्णधार बाबर आझम फलंदाजीत झिरो ठरला. पण त्याच्या संघाने ऑस्ट्रेलियन ॲरन हार्डीच्या अष्टपैलू कामगिरीच्या हिरोगिरीच्या जोरावर फायनल बाजी मारली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सॅम अयूब एकटा पडला, मार्नस लाबुशेनसह ग्लेन मॅक्सेवल फेल

अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबाद किंग्समन संघाची सुरुवात खराब झाली. सॅम अयूबचे अर्धशतक ५४ (५४) वगळता कर्णधार मार्नस लाबुशेन २० (१२), सदाकत ११ (६), हसन खान १२ (७) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. ग्लेन मॅक्सवेलला तर खातेही उघडता आले नाही. परिणामी हैदराबाद किंग्समनचा संघ १८ षटकात १२९ धावांत आटोपला. पेशावर झल्मी संघाकडून गोलंदाजीत ॲरन हार्डी याने ४ षटकात २७ धावा खर्च करत सर्वाधिक ४ बळी टिपले. 

PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये

ॲरन हार्डी पुरून उरला अन् बाबरचा पेशावर झल्मी चॅम्पियन ठरला

धावांचा पाठलाग करताना पेशावर झल्मीची सुरुवातही अडखळत झाली. मोहम्मद हॅरिस ६ धावा करून परतल्यावर कर्णधार बाबर आझमच्या पदरी भोपळा आला. कुसल मेंडिस ९ धावांवर परतल्यावर संघ अडचणीत सापडला असताना गोलंदाजीत धमक दाखवणाऱ्या ॲरन हार्डीने फलंदाजीतही चमकला. त्याने ३९ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी करत १६ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर संघाचा विजय निश्चित केला. त्याच्याशिवाय अब्दुल समद याने ३४ चेंडूत ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Peshawar Zalmi Clinch PSL 2026 Title Led by Babar Azam

Web Summary : Peshawar Zalmi, led by Babar Azam, won the PSL 2026, defeating Hyderabad Kingsmen. Aaron Hardie's all-round performance secured the victory, despite Azam's low score. Hardie's fifty and Abdul Samad's contribution led Zalmi to the championship.
टॅग्स :बाबर आजमटी-20 क्रिकेटग्लेन मॅक्सवेल