पुणेकर ऋतुराजची टीम इंडियात एन्ट्री! आणि मुंबईकर पृथ्वी शॉला कॅप्टन्सीची ‘लॉटरी’; जाणून घ्या सविस्तर

तो नेतृत्व करण्यासाठी सक्षम अन् पात्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:23 IST2025-11-24T16:20:14+5:302025-11-24T16:23:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Prithvi Shaw Replaces Ruturaj Gaikwad As Maharashtra Captain For SMAT T20 2025 League stage | पुणेकर ऋतुराजची टीम इंडियात एन्ट्री! आणि मुंबईकर पृथ्वी शॉला कॅप्टन्सीची ‘लॉटरी’; जाणून घ्या सविस्तर

पुणेकर ऋतुराजची टीम इंडियात एन्ट्री! आणि मुंबईकर पृथ्वी शॉला कॅप्टन्सीची ‘लॉटरी’; जाणून घ्या सविस्तर

Prithvi Shaw Replaces Ruturaj Gaikwad As Maharashtra Captain For SMAT T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. घरच्या मैदानावर रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बीसीसीआयनेऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. दोन वर्षांनी तो भारतीय संघाकडून वनडे खेळण्यासाठी सज्ज आहे. त्याची टीम इंडियात एन्ट्री होताच मुंबईकर पृथ्वी शॉला कॅप्टन्सीची लॉटरी लागली आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पृथ्वी शॉ महाराष्ट्र क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ऋतुराजची टीम इंडियात वर्णी; पृथ्वी शॉला मिळाली

सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ निवडला होता. पण ऋतुराजची टीम इंडियात वर्णी लागताच पृथ्वी शॉकडे महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धूरा सोवण्यात आली आहे. देशांतर्गत टी-२० स्पर्धेतील साखळी फेरीत पृथ्वीला फलंदाजीसह नेतृत्वातील कर्तृत्व दाखवून देण्याची ही चांगली संधी आहे.

IND vs SA : मार्कोचा खतरनाक बाउन्सर अन् मार्करमनं हवेत झेपावत टिपला डोळ्यांचं पारणं फेडणारा झेल! (VIDEO)

तो नेतृत्व करण्यासाठी सक्षम अन् पात्र 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऋतुराज गायकवाडच्या जागी पृथ्वी शॉकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व देण्यात आल्याची पुष्टी केली आहे. निवडकर्त्यांसह आणि महाराष्ट्र वरिष्ठ संघाचे संचालक तसेच मुख्य प्रशिक्षक शॉन विल्यम्स यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. तो संघाला एकत्र ठेवतो आणि संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो पात्र आहे, असे ते म्हणाले आहेत. 

महाराष्ट्र संघाकडून धमाकेदार कामगिरी

मुंबई संघातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉ याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेतील आतापर्यंतच्या पाच सामन्यातील सात डावात ४७० धावा करुन त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून १५६ चेंडूत २२२ धावांची खेळी आली होती. रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या फेरीतील लढतीनंतर तो महाराष्ट्र संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 
 

Web Title : ऋतुराज भारतीय टीम में; पृथ्वी शॉ SMAT T20 में महाराष्ट्र के कप्तान बने।

Web Summary : ऋतुराज गायकवाड़ के भारतीय वनडे टीम में चयन होने से पृथ्वी शॉ को सैयद मुश्ताक अली टी20 टूर्नामेंट में महाराष्ट्र की कप्तानी करने का मौका मिला। रणजी ट्रॉफी में शॉ का हालिया प्रदर्शन उनके नेतृत्व क्षमता को दर्शाता है।

Web Title : Ruturaj in India team; Prithvi Shaw captains Maharashtra in SMAT T20.

Web Summary : Ruturaj Gaikwad's selection for the Indian ODI team paved the way for Prithvi Shaw to captain Maharashtra in the Syed Mushtaq Ali T20 tournament. Shaw's recent performance in Ranji Trophy showcased his potential for leadership.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.