सिराजचं कौतुक, मितालीकडून 'टीम भारत'चं अभिनंदन; गोलंदाजाचाही गोड रिप्लाय

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामना रंगला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:24 AM2023-09-18T11:24:38+5:302023-09-18T11:41:48+5:30

whatsapp join usJoin us
Praise from Siraj, congratulations to 'Team Bharat' from Mithali Raj; Sweet reply from the bowler too | सिराजचं कौतुक, मितालीकडून 'टीम भारत'चं अभिनंदन; गोलंदाजाचाही गोड रिप्लाय

सिराजचं कौतुक, मितालीकडून 'टीम भारत'चं अभिनंदन; गोलंदाजाचाही गोड रिप्लाय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताने श्रीलंकेला नमवत आठव्यांदा आशिया चषक उंचावला. त्यामुळे जगभरातून टीम इंडियाचं अभिनंदन करण्यात असून भारतीय खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. त्यातच, श्रीलंकन फलंदाजांना एकापाठोपाठ एक करत तंबूत पाठवणाऱ्या गोलंदाज मोहम्मद सिराजचं कौतुक होत आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह महिला टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजनेही मोहम्मदच्या गोलंदाजीचं कौतुक केलंय. मात्र, मितालीने यावेळी भारतीय संघाचं कौतुक करताना टीम इंडियाऐवजी टीम भारत असं म्हटलंय. 

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामना रंगला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने इतिहास रचत केवळ १६ चेंडूत श्रीलंकेचे ५ बळी घेतले. पहिल्या षटकांत जसप्रीत बुमराहने एक बळी घेतल्यानंतर सिराजने यजमानांना मोठे धक्के दिले. सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकन फलंदाजांनी गुडघे टेकल्यामुळे भारताच विजय सहज झाला. श्रीलंकेला ५० धावांवरच रोखल्यानंतर भारताने १० गडी राखून मोठा विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात सिराजचा मोठा वाटा राहिला, त्यामुळेच त्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताबही देण्यात आला. सिराजच्या गोलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत आहे.  


मास्टरब्लास्टर सचिनं तेंडुलकरनेही टीम इंडियाच्या विजयाचं अभिनंदन करताना, सिराजच्या गोलंदाजीचं कौतु केलंय. तर, मिताली राजनेही भारतीय संघाचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं आहे. मोहम्मदची फिरकी सनसनाटी होती, असे म्हणत त्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलंय. तसेच, भारतीय संघाचं कौतुक करताना, टीम इंडियाऐवजी टीम भारत म्हणत मितालीने संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. दरम्यान, मितालीच्या या ट्विटला सिराजनेही थँक्यू व्हेरी मच दीदी, असे म्हणत गोड रिप्लाय दिलाय. 

दरम्यान, देशात इंडिया आणि भारत नावावरुन वाद सुरू असताना अनेक क्रिकेटर्संनेही या वादावर परखडपणे भाष्य केलं होतं. सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग यांनीही भारत नावाचंच समर्थन केलं होतं. आता, मितालीनेही टीम भारत म्हणत अभिनंदन केल्यामुळे तिच्या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. 
 

Web Title: Praise from Siraj, congratulations to 'Team Bharat' from Mithali Raj; Sweet reply from the bowler too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.