ठळक मुद्देदुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २४९ धावांची आघाडीइंग्लंडचा संघ १३४ धावांवर सर्वबाद
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी चेन्नईचा दौरा केला. चेन्नईला पोहोचल्यानंतर जेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर एम.ए.चिदंबरम स्टेडिअम जवळून गेलं तेव्हा त्यांना त्या ठिकाणी सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामना दिसला. यावेळी त्यांना त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हेलिकॉप्टरमधून काढलेल्या सामन्याच्या फोटो शेअर केला.
चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांनी दमदार खेळ करताना भारताला पहिल्या डावात ३२९ धावा करून दिल्या. पण, इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फारकाळ जम बसवता आला नाही. रविचंद्रन अश्विनच्या जाळ्यात ते सहज अडकले. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर गुंडाळून टीम इंडियानं पहिल्या डावात १९४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ५४ धावा करताना २४९ धावांनी आघाडी वाढवली आहे. शुबमन गिलच्या रुपानं भारताला पहिला धक्का बसला.
पहिल्या डावात भारत ३२९ धावांवर सर्वबादतळाचे ४ फलंदाज २९ धावांत माघारी परतल्यानं टीम इंडियाला पहिल्या डावात ३२९ धावांवर समाधान मानावे लागले. रिषभ पंत ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ६ बाद ३०० धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरूवात केली. रिषभ पंतनं फटकेबाजी करताना कसोटी क्रिकेटमधील ८वे अर्धशतक पूर्ण केलं. मोईन अली ४, ऑली स्टोन ३ आणि जॅक लिच यानं २ विकेट्स घेतल्या. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानं रोरी बर्न्सनं पहिल्याच षटकात पायचीत केलं. त्यानंतर आर अश्विननं इंग्लंडचा दुसरा सलामीवीर डॉम सिब्ली ( १६) याची विकेट घेतली. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलनं इंग्लंडला मोठा धक्का दिला. पहिल्या कसोटीतील द्विशतकवीर जो रूटला याला बाद केले. ही भारतासाठी मोठी विकेट ठरली. त्यानंतर अश्विननं दोन विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्सचा ( १८) त्रिफळा उडवून त्यानं विक्रमाला गवसणी घातली.
इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकले नाही. यष्टिरक्षक रिषभ पंतनंही दोन अफलातून झेल घेत इंग्लंडला बॅकफूटवर पाठवले. इंग्लंडचा बेन फोक्स ४२ धावांवर नाबाद राहिला.