टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली! पंतप्रधान मोदी म्हणाले, "असामान्य खेळाचा, असामान्य..."

PM Modi on Team India Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत चषकावर नाव कोरलं. या मोठ्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय संघांचं कौतुक केलं. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 22:47 IST2025-03-09T22:42:17+5:302025-03-09T22:47:17+5:30

whatsapp join usJoin us
pm modi congratulates team india on winning champions trophy | टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली! पंतप्रधान मोदी म्हणाले, "असामान्य खेळाचा, असामान्य..."

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली! पंतप्रधान मोदी म्हणाले, "असामान्य खेळाचा, असामान्य..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Champions Trophy Final PM Modi:आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं या असामान्य कामगिरीबद्दल कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनी खास ट्विट करत आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, अशा भावना व्यक्त केल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झाला. न्यूझीलंडने भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने ४९ षटकातच ते गाठत विजयाला गवसणी घातली. कर्णधार रोहित शर्माच्या खेळीने भारताच्या विजयाचा पाया रोवला. 

पंतप्रधान मोदींनी केलं टीम इंडियाचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, 'एक असामन्य कामगिरी आणि त्याचा असामन्य निकाल! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल क्रिकेट संघांचा अभिमान वाटतोय. त्यांनी पूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. शानदार खेळ केल्याबद्दल आपल्या संघाचं खूप खूप अभिनंदन", अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. 

पंतप्रधान मोदींबरोबर गृहमंत्री अमित शाह यांनीही टीम इंडियांचं अभिनंदन केलं आहे. 

"एक असा विजय ज्याने इतिहास घडवला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जोरदार विजय मिळवल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन. मैदानावरील तुमची प्रेरणादायी ऊर्जा आणि विजजी रथाने देशाचा गौरव वाढवला आहे. उत्कृष्ट क्रिकेटसाठी आणखी एक उंची तुम्ही स्थापित केली. पुढील स्पर्धांमध्ये अशीच कामगिरी करत रहा", असे अमित शाह यांनी म्हटले आहे. 

Web Title: pm modi congratulates team india on winning champions trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.