ICC T20 WC 2026, Pakistans Semi Final Scenario After ENG Beat NZ : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली. विल जॅक्स आणि रेहमान अहमदच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाला ४ विकेट्स राखून पराभवाचा धक्का दिला. या निकालानंतर पाकिस्तानच्या सेमीच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण त्यांच्यासमोर सेमीचं तिकीट मिळवण्यासाठी जे समीकरण आहे ते खूपच अवघड आहे. इथं जाणून घेऊयात सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानसमोर कसे आहे समीकरण? त्यांना ते सोडवणं शक्य होईल का? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतरही न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर, कारण...
श्रीलंका संघ आधीच स्पर्धेबाहेर गेल्याने इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पाकिस्तानसाठीच महत्त्वाचा होता. न्यूझीलंडच्या संघाला या सामन्यात पराभवाचा सामना केल्यामुळे ते दुसऱ्या गटात ३ गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची निव्वळ धावगती (NRR) +१.३९० अशी आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाच्या खात्यात एक गुण असून त्यांची निव्वळ धावगती -०.४६१ अशी आहे. जर सेमीफायनलसाठी आपली दावेदारी ठोकायची असेल तर त्यांना श्रीलंकेविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकून न्यूझीलंडच्या संघाला ओव्हरटेक करावे लागेल.
पाकिस्तानला सेमीफायनल गाठायची असेल तर...जर पाकिस्तानने सुपर ८ फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभूत केले तर पाकिस्तानच्या खात्यात ३ गुण जमा होतील. न्यूझीलंड आधीच ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या परिस्थितीत दोन्ही संघातील ज्या संघाची धावगती उत्तम असेल तो संघ सेमीसाठी पात्र ठरेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली तर पाकिस्तानच्या संघाला किमान ६५ ते ६६ धावांनी हा सामना जिंकावा लागेल. याशिवाय धावांचा पाठलाग करताना त्यांना १३ व्या षटकापर्यंत विजय नोंदवावा लागेल. जर पाकिस्तानच्या संघाला हे जमलं नाही तर न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतरही सेमीफायनलमध्ये धडक मारेल.
Web Summary : England's win over New Zealand keeps Pakistan's semi-final hopes alive, but qualification is tough. Pakistan must beat Sri Lanka convincingly, surpassing New Zealand's net run rate. Winning by a large margin or chasing the target quickly is crucial for Pakistan to advance.
Web Summary : इंग्लैंड की न्यूजीलैंड पर जीत ने पाकिस्तान की सेमीफाइनल उम्मीदों को जिंदा रखा है, लेकिन क्वालीफाई करना मुश्किल है। पाकिस्तान को श्रीलंका को हराकर न्यूजीलैंड के नेट रन रेट को पार करना होगा। बड़े अंतर से जीत या जल्दी लक्ष्य का पीछा करना पाकिस्तान के लिए महत्वपूर्ण है।