Join us  

ENGvPAK : अरेरे! पाकिस्तानची काय ही अवस्था; क्रिकेट सामन्याच्या प्रक्षेपणासाठीही नाहीत पैसे! 

पाकिस्तानमध्ये नाही होणार इंग्लंड-पाकिस्तान मालिकेचं प्रक्षेपण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 5:49 PM

Open in App

जवळपास 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या आजचा तिसरा दिवस आहे. या मालिकेनंतर इंग्लंड-पाकिस्तान मालिका होणार आहे. त्यासाठी पाकिस्तानचे क्रिकेटपटू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. तेथे पाकिस्तानचा संघ तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण, इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात आणखी एक समस्या वाढली आहे. ही मालिका पाकिस्तानमध्ये प्रक्षेपित होणआर नाही, कारण त्यांच्याकडे त्यासाठीचे पैसेच नाहीत. त्यामुळे आता पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार आहे. 

शक्तीचा माज दाखवल्यानं आशियाई देशांचं नुकसान होईल; पाकिस्तानी क्रिकेटपटूची सौरव गांगुलीवर टीका

पाकिस्तानमधील स्थानिक ब्रॉडकास्टर पीटीव्हीनं या मालिकेचे सामने दाखवण्यासाठी इंटरनॅशनल ब्रॉडकास्टरकडून आकारली जाणारी रक्कम देण्याइतके पैसे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानात ही मालिका प्रक्षेपित होऊ शकणार नाही. पीटीव्ही हे सरकारी नेटवर्क आहे. हे नेटवर्क पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवते. पण, त्यासाठीची लिंक इंटनॅशनल ब्रॉडकास्टर्सकडून खरेदी केली जाते. त्याबदल्यात पीटीव्हीला काही रक्कम इंटनॅशनल ब्रॉडकास्टर्सना द्यावी लागते. पण, सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली आहे आणि तिच अवस्था पीटीव्हीचीही आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या सामन्यांसाठी त्यांच्याकडे पैसेच उरलेले नाहीत. 

केवळ याच मालिकेसाठीचे पैसे त्यांना द्यायचे नाहीत, तर यापूर्वीच्या मालिकेचे पैसेही त्यांनी अजून दिलेले नाहीत. त्यामुळे हे कर्ज फेडत नाही, तोपर्यंत इंटरनॅशनल ब्रॉडकास्टर पाकिस्तानच्या सामन्याची लिंक पीटीव्हीला देणार नाहीत. आता पीटीव्हीनं पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे ( पीसीबी) मदत मागितली आहे. पीसीबीनंही त्यांना स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यास सांगून हात झटकले आहेत. या मालिकेसाठी पीसीबीलाही स्पॉन्सर्स मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे त्यांना शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावून मैदानावर उतरावे लागणार आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुनील गावस्कर यांनी कोणत्या संघाविरुद्ध घेतली होती 10 हजारावी धाव? पाहा तो ऐतिहासिक क्षण

Shocking : ऑलिम्पिकपटूचा समुद्रात बुडून मृत्यू; मालकाच्या प्रतिक्षेत कुत्रा किनाऱ्यावर बसून!

सुनील गावस्कर यांना सलाम; उचलला 35 लहान मुलांच्या ऑपरेशनचा खर्च

Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

टीम इंडियातील दोन खेळाडूंमध्ये झालेला वाद; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली; सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट!

शाहरुख खाननं दिलेला शब्द पाळला नाही; सौरव गांगुलीचा KKRवर गंभीर आरोप

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड