भारताने धुलाई करताच पाकिस्तानी संघात ५ मोठे बदल; 'करा किंवा मरा'च्या मॅचमध्ये श्रीलंकेशी भिडणार

PAK vs SL : आशिया चषकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:30 PM2023-09-14T12:30:05+5:302023-09-14T12:30:35+5:30

whatsapp join usJoin us
  Pakistan squad for PAK vs SL match in asia cup 2023 has made five changes, Mohammad Haris, Saud Shakeel, Mohammad Nawaz, Mohammad Wasim Jr and Zaman Khan have entered while Fakhar Zaman, Alaman Ali Agha, Faheem Ashraf, Naseem Shah and Haris Rauf out in | भारताने धुलाई करताच पाकिस्तानी संघात ५ मोठे बदल; 'करा किंवा मरा'च्या मॅचमध्ये श्रीलंकेशी भिडणार

भारताने धुलाई करताच पाकिस्तानी संघात ५ मोठे बदल; 'करा किंवा मरा'च्या मॅचमध्ये श्रीलंकेशी भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

asia cup 2023 : भारताविरूद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी आज आशिया चषकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होत आहे. 'आशियाई किंग्ज' श्रीलंका आणि यजमान पाकिस्तान यांच्यातील विजयी संघ रविवारी रोहितसेनेशी अंतिम सामना खेळेल. दोन्हीही संघ आपल्या शेवटच्या सामन्यात भारताकडून पराभूत होऊन इथे पोहचले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भारताकडून दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी संघात पाच मोठे बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे नसीम शाह आणि हारिस रौफ हे प्रमुख गोलंदाज संघाबाहेर झाले आहेत. 

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघात पाच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद हारिस, सौद शकील, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनिअर आणि झमान खान या शिलेदारांचा समावेश आहे. तर, फखर जमान, अलमान अली आघा, फहीम अश्रफ, नसीम शाह आणि हारिस रौफ यांना वगळण्यात आले आहे. 

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ - 
बाबर आझम (कर्णधार), इमाम-उल-हक, मोहम्मद हारिस, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, झमान खान.  

भारताविरूद्धच्या सामन्याठी कसा होता पाकिस्तानी संघ - 
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, अलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.  

दरम्यान, भारताकडून पराभूत झाल्यानंतर बाबर आझमच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण २२८ धावांच्या फरकाने पराभव झाल्यामुळे पाकिस्तानच्या नेट रनरेटमध्ये मोठी घसरण झाली. पण, भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अंतिम फेरीत भिडण्याची शक्यता आहे. खरं तर भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर पाकिस्तानचा आजचा विजय शेजाऱ्यांना देखील अंतिम फेरीत पोहचवू शकतो.

Web Title:   Pakistan squad for PAK vs SL match in asia cup 2023 has made five changes, Mohammad Haris, Saud Shakeel, Mohammad Nawaz, Mohammad Wasim Jr and Zaman Khan have entered while Fakhar Zaman, Alaman Ali Agha, Faheem Ashraf, Naseem Shah and Haris Rauf out in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.