Pakistani Bowler Usman Tariq Action, PAK vs AUS T20: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान पाकिस्तानी फिरकीपटू उस्मान तारिक याच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन (Cameron Green) याने उघडपणे तारिकच्या ॲक्शनवर शंका उपस्थित केली आहे.
नेमकी घटना काय?
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावातील ११ व्या षटकात ही घटना घडली. उस्मान तारिकच्या चौथ्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात कॅमेरून ग्रीन ३५ धावांवर बाद झाला. बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना ग्रीनने सीमारेषेबाहेर जाताना हाताने 'थ्रो' (दगडफेक) करण्यासारखी नक्कल केली. या हातवाऱ्याद्वारे त्याने तारिकची गोलंदाजीची ॲक्शन 'बेकायदेशीर' (Chucking) असल्याचे सुचवले.
याआधी दोनवेळा क्लिन चिट
उस्मान तारिकची गोलंदाजीची शैली नेहमीच चर्चेत राहिली आहे. यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्येही त्याच्या ॲक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, पीसीबीच्या बायोमेकॅनिक्स लॅबमध्ये झालेल्या चाचणीत त्याची ॲक्शन आयसीसीच्या १५-डिग्रीच्या मर्यादेत असल्याचे सांगत त्याला 'क्लिन चिट' देण्यात आली होती.
ग्रीनवर टीका
माजी पाकिस्तानी कर्णधार रमीज राजा यांनी ग्रीनच्या या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. "मैदानावर जे समोर आहे त्याचा सामना करणे खेळाडूचे काम आहे, अशा प्रकारे तक्रार करणे चुकीचे आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, उस्मान खानने या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "ॲक्शन योग्य आहे की नाही हे ठरवणे पंचांचे काम आहे. तारिक हा एक चांगला गोलंदाज असून तो योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत आहे."
सामन्याचा निकाल
वाद झाल्यानंतर पाकिस्तानने हा सामना ९० धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. पाकिस्तानने १९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ १०८ धावांत गारद झाला. उस्मान तारिकने या सामन्यात २ बळी घेतले. आगामी टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर उस्मान तारिकची गोलंदाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली असून, आयसीसी यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Pakistani spinner Usman Tariq's bowling action is under scrutiny after Australia's Cameron Green suggested it was illegal. Previously cleared, Tariq's action faces renewed criticism amid the ongoing T20 series. Despite the controversy, Pakistan won the match, with Tariq taking two wickets.
Web Summary : ऑस्ट्रेलिया के कैमरून ग्रीन द्वारा अवैध बताए जाने के बाद पाकिस्तानी स्पिनर उस्मान तारिक की गेंदबाजी एक्शन जांच के दायरे में है। पहले मंजूरी मिलने के बावजूद, तारिक की एक्शन को टी20 सीरीज के बीच फिर से आलोचना का सामना करना पड़ रहा है। विवाद के बावजूद, पाकिस्तान ने मैच जीता, तारिक ने दो विकेट लिए।