पाकिस्ताननं केली भारताची कॉपी! न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी

PAK vs NZ: पाकिस्तानी संघ न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 02:48 PM2024-01-08T14:48:21+5:302024-01-08T14:48:48+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs NZ T20 Series Mohammad Rizwan has been appointed as vice-captain of Pakistan Cricket Team in T20 tour to NewZealand, read here details  | पाकिस्ताननं केली भारताची कॉपी! न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी

पाकिस्ताननं केली भारताची कॉपी! न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs NZ T20 Series: ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानी संघ न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तानन्यूझीलंडशी दोन हात करेल. पाकिस्तानी संघ १२ जानेवारीपासून न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यासाठी शेजाऱ्यांच्या संघाची आधीच घोषणा झाली आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी एक मोठी घोषणा करत उपकर्णधारपदी मोहम्मद रिझवानची वर्णी लावली. वन डे विश्वचषकातील पराभवानंतर पाकिस्तानी संघात अनेक बदल करण्यात आले आहेत.

बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला अन् पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवनिर्वाचित कर्णधारांची घोषणा केली. शान मसूदकडे कसोटी तर शाहीन आफ्रिदीकडे ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारतीय संघाप्रमाणेच पाकिस्तान देखील द्विपक्षीय मालिकांसाठी नव्या चेहऱ्यांना आजमावून पाहत आहे. 

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - 
शाहीन आफ्रिदी (कर्णधार), आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, आझम खान, अबरार अहमद, बाबर आझम, फखर झमान, हारिस रौफ, हसिबुल्लाह खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (उपकर्णधार), मोहम्मद वसिम, सहिबझादा फर्हान, सैय अयुब, उसामा मीर, झमान खान. 

पाकिस्तानचा न्यूझीलंड दौरा -

  1. १२ जानेवारी - पहिला सामना 
  2. १४ जानेवारी - दुसरा सामना
  3. १७ जानेवारी - तिसरा सामना
  4. १९ जानेवारी - चौथा सामना 
  5. २१ जानेवारी - पाचवा सामना 

Web Title: PAK vs NZ T20 Series Mohammad Rizwan has been appointed as vice-captain of Pakistan Cricket Team in T20 tour to NewZealand, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.