PAK vs NZ: विल्यमसनचा सोपा झेल पण बाबर 'फेल', पाकिस्तानची चांगलीच धुलाई, आकडा २०० पार

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 01:40 PM2024-01-12T13:40:21+5:302024-01-12T13:40:59+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs NZ 1st t20 Babar Azam drops an easy catch to Kane Williamson and New Zealand score 226 | PAK vs NZ: विल्यमसनचा सोपा झेल पण बाबर 'फेल', पाकिस्तानची चांगलीच धुलाई, आकडा २०० पार

PAK vs NZ: विल्यमसनचा सोपा झेल पण बाबर 'फेल', पाकिस्तानची चांगलीच धुलाई, आकडा २०० पार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Babar Azam Trolled Badly: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळवला जात आहे. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानची कमान युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या संघाची धुरा केन विल्यमसनकडे आहे. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषक पाहता ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने केन विल्यमसनचा सोपा झेल सोडला अन् शेजाऱ्यांना मोठा फटका बसला. बाबरने सोपा झेल सोडल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. 

आजच्या सामन्यातून पाकिस्तानी संघात पदार्पण करत असलेल्या अब्बास आफ्रिदीच्या गोलंदाजीवर विल्यमसन फसला अन् चेंडू हवेत गेला. बाबर बरोबर चेंडूच्या खाली आला पण त्याला झेल पकडता आला नाही. जीवनदान मिळताच विल्यमसनने मोठी खेळी केली. तो ४२ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. पाकिस्तानी संघाला खराब क्षेत्ररक्षणासाठी देखील ओळखले जाते. याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. तो आजही पाहायला मिळाला. 

पाकिस्तानची चांगलीच धुलाई
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान किवी संघाने धावांचा डोंगर उभारला. निर्धारित २० षटकांत ८ बाद २२६ धावा करण्यात न्यूझीलंडला यश आले. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक (६१) धावा केल्या, तर केन विल्यमसनला (५७) धावा करण्यात यश आले. 

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती. पहिल्याच षटकातच संघाला पहिला धक्का बसला. शाहीनच्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर कॉन्वे बाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकात शाहीन गोलंदाजीला आला आणि या षटकात फिन लनने २४ धावा कुटल्या. या षटकात त्याने दोन षटकार आणि तीन चौकार मारले.

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ -
शाहीन आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सॅम अयुब, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (यष्टीरक्षक), आमिर जमाल, उसामा मीर, अब्बास आफ्रिदी, हारिस रौफ.

न्यूझीलंडचा संघ -
केन विल्यमसन (कर्णधार), फिन अलेन, डेव्हॉन कॉन्वे, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साऊदी, इश सोधी, बेन सियर्स.

Web Title: PAK vs NZ 1st t20 Babar Azam drops an easy catch to Kane Williamson and New Zealand score 226

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.