PAK vs SL Live Streaming Where To Watch Todays Asia Cup 2025 Super Four 17th Match : आशिया चषक स्पर्धेतील १७ व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे. गुरुवारी, २५ सप्टेंबला दुबईच्या मैदानात हे दोन्ही संघ जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाविरुद्ध भिडण्यासाठी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकतील. बुधवारी याच मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध स्पर्धेतील सलग पाचवा विजय नोंदवत फायनल जंक्शन गाठलंय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाक जिंकले तर इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर २४ तासांच्या आत बांगलादेशचा संघ पुन्हा मैदानात उतरुन दुसऱ्या प्रयत्नात फायनल गाठण्यासाठी मैदानात उतरेल. दुसऱ्या बाजूला यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत दोन वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ल्यावर श्रीलंकेवर राग काढत पाकिस्तानच्या संघाने फायनलची दावेदारी भक्कम केलीये. जर या सामन्यात पाकनं बाजी मारली तर आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच IND vs PAK यांच्यात फायनलचा सामना रंगल्याचे पाहायला मिळेल. इथं एक नजर टाकुयात कुठं अन् कसा पाहता येईल PAK vs BAN यांच्यातील सामना? कसा आहे दोन्ही संघातील आतापर्यंतचा टी-२० तील रेकॉर्ड अन् सेमीच्या लढतीत कुणाचं पारडे आहे जड त्यासंदर्भातील सविस्तर माहिती....
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी
पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील T20I मधील हेड टू हेड रेकॉर्ड (PAK vs BAN T20I Head To Head Record)
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील बांगलादेशसमोर पाकिस्तानचं निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत दोन्ही संघात २५ टी-२० सामने झाले आहेत. यातील २० सामन्यात पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवलाय. बांगलादेशच्या संघाला फक्त पाच वेळा विजय मिळता आलाय. बॅक टू बॅक मॅच खेळण्याची आलेली वेळ अन् त्यात पाकिस्तान विरुद्धचा खराब रेकॉर्डमुळे बांगलादेश संघासाठी ही खऱ्या अर्थाने अग्नी परीक्षा असेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे या गृहितकावर बांगलादेश सर्वकाही अवलंबून असेल.
भारतात कुठं अन् कसा पाहता येईल PAK vs BAN यांच्यातील सामना? (Pakistan vs Bangladesh, Super Fours Live Streaming And Telecast In India)
- लाईव्ह स्ट्रीमिंग : SonyLIV अॅप आणि वेबसाइटसह फॅनकोड
- टेलिव्हिजन: सोनी स्पोर्ट्स (Sony Sports 1) आणि सोनी स्पोर्ट्स ५ (Sony Sports 5) (इंग्रजी समालोचन)
- सोनी स्पोर्ट्स ३ (Sony Sports 3) (हिंदी समालोचन)
- सोनी स्पोर्ट्स ४ (Sony Sports 4) (तमिळ अन् तेलगू समालोचन)
English summary :
Bangladesh faces Pakistan in a crucial Asia Cup match after a loss to India. Pakistan, after defeating Sri Lanka, eyes a final spot. Pakistan dominates T20Is against Bangladesh (20-5). The match will be broadcast on Sony Sports and SonyLIV.
Web Title: PAK vs BAN Live Streaming: Bangladesh's second try in 24 hours! If Pakistan wins, it will be the first time in history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.