Join us

सुरेश रैनाची 'ऑक्सिजन'साठी साद; सोनू सूद म्हणाला, सिलिंडर पोहोचेल फक्त १० मिनिटांत!

Suresh raina asks for oxygen cylinder sonu sood : बॉलिवूड स्टार आणि सामान्य लोकांचा नायक बनलेला सोनू सूदने रैनाला तातडीने तपशील पाठवण्याची मागणी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:46 IST

Open in App

कोरोनाच्या प्रकोपामुळे मागच्या काही दिवसात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. सर्वसामान्यांपासून मोठ्या मंडळीपर्यंत सगळ्यांनाच वैद्यकिय मदतीची गरज भासत आहे. भारताचे माजी फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) स्टार फलंदाज सुरेश रैनाने गुरुवारी सोशल मीडियावर ऑक्सिजन सिलिंडरसाठी विनंती केली, त्यामुळे बरेच लोक मदतीसाठी पुढे आले. बॉलिवूड स्टार आणि सामान्य लोकांचा नायक बनलेला सोनू सूदने रैनाला तातडीने तपशील पाठवण्याची मागणी केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करत रैनाने मेरठमधील काकूंसाठी ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीसाठी विनवणी केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती शेअर करताना रैनाने मावशीबद्दल सांगितले की ते 65 वर्षांचे आहेत आणि त्यांना फुफ्फुसांच्या संसर्गाने ग्रासले आहे. यासह रैनाने मावशीच्या ऑक्सिजनच्या पातळीचा देखील उल्लेख केला.

दरम्यान रैनाच्या संदेशानंतर लगेचच सोनू सूद ट्विटरवर देवदूताप्रमाणे दिसला आणि त्याने उत्तर दिले की ऑक्सिजन सिलिंडर दहा मिनिटांत पोहोचत आहे.  नंतर रैनाने सर्वांचे आभार मानले आणि म्हणाला की सर्वांची प्रशंसा करावी तेव्हढी कमी आहे. सिलेंडरची व्यवस्था केली गेली आहे आणि आपणा सर्वांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. 

टॅग्स :सोनू सूदऑक्सिजनबॉलिवूडकोरोना वायरस बातम्या