New Zealand into ICC T20 World Cup 2026 Super 8 With Win Against Canada : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यातील कॅनडा विरुद्धच्या विजयासह न्यूझीलंडच्या संघानेही सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना युवराज सिंग सामराच्या शतकाच्या जोरावर कॅनडाच्या संघाने निर्धारित २० षटकात १७३ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. टिम सिफर्ट ६ (१०) आणि फिन एलन २१ (८) दोघे स्वस्तात माघारी परतल्यावर ग्लेन फिलिप्स आणि रचिन रविंद्रनं संघाला ८ विकेट्स आणि ५ षटके राखून दिमाखादार विजय नोंदवला. 'ड' गटातून याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युवराजचं विक्रमी शतक ठरलं व्यर्थ!
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर कॅनडाचा सलामीवीर युवराज सामराने ६५ चेंडूत ११० धावांच्या खेळीसह संघाला १७३ धावांपर्यंत पोहचणावारी दमदार खेळी केली. त्याने या खेळीत अनेक विक्रम सेट केले. टी-२० वर्ल्ज कप स्पर्धेत असोसिएट संघाकडून शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला. याशिवाय सर्वात कमी वयात शतकी खेळीचा विश्वविक्रमही त्याने आपल्या नावे केला. पण त्याची ही ऐतिहासिक खेळी शेवटी व्यर्थ ठरली. न्यूझीलंजच्या संघाने सुरुवातीच्या पढझडीतून सावरत अपेक्षेप्रमाणे सुपर ८ मध्ये प्रवेश केला.
IND vs AUS: टीम इंडियासाठी गूड न्यूज, चार महिन्यानंतर विस्फोटक फलंदाजाचं संघात कमबॅक!
ग्लेन फिलिप्स आणि रचिन जोडी जमली! दोघांनी १५ व्या षटकातच संपवली मॅच
धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने ३० धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि रचिन रविंद्र जोडी जमली. दोघांनी १५ व्या षटकातच मॅच संपवली. ग्लेन फिलिप्सनं ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने २११ च्या स्ट्राईक रेटसह ७६ धावांची नाबाद खेळी साकारत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. यंदाच्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करणारा रचिन रविंद्रही फ़ॉर्मध्ये परतला. त्याने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याची खेळी न्यूझीलंडसंघाला मोठा दिलासा देणारी अशी आहे.
Web Summary : Despite युवराज Singh's century, New Zealand defeated Canada, securing their Super 8 spot in the T20 World Cup. Phillips and Ravindra's half-centuries led New Zealand to a comfortable victory after early wickets fell.
Web Summary : युवराज सिंह के शतक के बावजूद, न्यूजीलैंड ने कनाडा को हराकर टी20 विश्व कप में सुपर 8 में जगह बनाई। शुरुआती विकेट गिरने के बाद फिलिप्स और रविंद्र के अर्धशतकों ने न्यूजीलैंड को आसान जीत दिलाई।