Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही तर रोहित-द्रविडची ‘जादू’! टीम इंडियाची आतली गोष्ट शेअर करत अश्विननं साधला गंभीरवर निशाणा

नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:04 IST

Open in App

भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या आक्रमक फलंदाजीच्या यशस्वी रणनितीचे  सर्व श्रेय माजी कर्णधार रोहित शर्मासह माजी प्रशिक्षक राहुल द्रविड याचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. फलंदाजीतील आक्रमकतेच्या जोरावरच भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये दबदबा दाखवून दिला आहे, असेही तो म्हणाला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नो गंभीर! रोहित-द्रविडनं टीम इंडियाला केलं खंबीर

आर. अश्विन याने आपल्या यूट्यूब चॅनलवरील खास कार्यक्रमात रोहितची कॅप्टन्सी आणि राहुल द्रविडच्या कोचिंगची गोष्ट शेअर केली आहे. तो म्हणाला आहे की, टीम इंडियाचे नेतृत्व करत असताना रोहित शर्मा स्वत: आक्रमक खेळी करत आपल्याला काय करायचं ते उदाहरण दाखवून देताना पाहायला मिळाले. टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा फलंदाजीत बदललेला दृष्टिकोन (आक्रमकता) याचे सर्व श्रेय रोहित आणि राहुल भाई यांचे आहे.

IPL 2026: ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द धोक्यात? पंजाबने सोडलं, आता लिलावातून बाहेर, कारण काय?

नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?

प्रशिक्षक राहुल द्रविडनं मार्ग दाखवला आणि कर्णधाराच्या रुपात रोहित शर्मानं स्वत: या दृष्टिकोनातून खेळी साकारत सर्वांसमोर एक आदर्श दाखवून दिला. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजांची सरासरी नव्हे तर स्ट्राइक रेटचा विचार करणेही गरजेचे असते. रोहितनं स्वत: पुढाकार घेऊन संघात अमुलाग्र बदल घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला, यावर आर. अश्विनने भर दिला आहे.

ICC स्पर्धा जिंकण्याची मोहिम कधी सुरु झाली? अश्विनने शेअर केली त्यामागची स्टोरी

व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये भारतीय संघ आयसीसी स्पर्धेत मागे पडला होता. सातत्याने पदरी येणारी निराशेनंतर भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीचा फॉर्म्युला आजमावला. २०२३ मध्ये घरच्या मैदानात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची पहिली झलक पाहायला मिळाले. आक्रमक फलंदाजीच्या रणनितीसह भारतीय संघाने साखळी फेरीत आपला दबदबा दाखवून दिला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभवाचा धक्का दिल्यावर हीच रणनिती कायम ठेवत भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या २०२४ ची वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती, असे आर अश्विनने म्हटले आहे.

अश्विनचा अप्रत्यक्षरित्या गंभीरवर निशाणा

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघावर घरच्या मैदानात लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली. गुवाहाटी येथील सलग दुसऱ्या कसोटी पराभवानंतर पत्रकारपरिषदेत भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर याने इंग्लंडमधील कसोटीतील कामगिरीसह ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मी कोच होतो हे विसरू नका, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मिळवलेल्या या यशाची स्क्रीप्ट द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच लिहिली गेली होती, असे सांगत आर. अश्विन याने अप्रत्यक्षरित्या विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधल्याचे दिसते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit-Dravid's magic: Ashwin shares Team India's story, targets Gambhir.

Web Summary : Ashwin credits Rohit Sharma and Rahul Dravid for Team India's aggressive, successful white-ball cricket strategy. He indirectly criticized Gautam Gambhir, highlighting Rohit and Dravid's pivotal roles in the team's success and strategic shift after ICC setbacks, leading to the 2024 World Cup victory.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माराहुल द्रविडगौतम गंभीरआर अश्विन