Join us

भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

 भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेच्या कोणत्या हंगामातून घेतली होती माघार? जाणून घ्या त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:33 IST

Open in App

 Asia Cup 2025 Sri Lanka Hold The Unique Record For Most Asia Cup Appearances In History : आशिया चषक स्पर्धेचे यंदाच्या हंगामातील यजमानपद हे भारताकडे आहे. पण पाकिस्तान विरुद्धच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे ही स्पर्धा यूएईच्या मैदानातील दोन स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आशियाई देशात क्रिकेटचा प्रचार अन् विकास करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धेतील पहिली स्पर्धा ही १९८४ मध्ये खेळवण्यात आली. यंदाच्या वर्षी १७ व्या हंगामासाठी ८ संघ मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ हा सर्वात यशस्वी ठरला आहे. पण प्रत्येक हंगामात खेळण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या नावे आहे. इथं आपण भारत- पाकिस्तान संघ श्रीलंकेच्या मागे कसा पडला? कोणत्या हंगामात हे दोन संघ आशिया कप स्पर्धेपासून लांब राहिले? जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!१६ हंगाम अन् ३ विजेते संघ! टीम इंडिया राहिलीये आशियाचा किंग

भारत- पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन आशियाई संघाच्या सहभागासह १९८४ मध्ये युएईच्या मैदानात पहिली वहिली आशिया कप स्पर्धा झाली. वनडे फॉरमॅटमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने पाकला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. पाकिस्तानचा संघ पहिल्या हंगामात सर्वात तळाला राहिला. त्यानंतर आतापर्यंत भारतीय संघाने आतापर्यंत ८ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेनं ६ वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले असून पाकिस्तानच्या संघाने दोन वेळा या स्पर्धेत बाजी मारलीये.   

वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेला पंच! भारत-पाक हायहोल्टेज मॅच वेळी करणार 'पंचगिरी' 

 भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेच्या कोणत्या हंगामातून घेतली होती माघार? जाणून घ्या त्यामागचं कारण

दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेतील दुसरा हंगाम १९८६ मध्ये यूएईतील शारजाच्या मैदानात खेळवण्यात आला.  श्रीलंकेविरुद्धच्या राजकीय तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतीय संघाने त्यावेळी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाच्या अनुपस्थितीत मग बांगलादेशच्या संघाची या स्पर्धेत एन्ट्री झाली अन् श्रीलंकेनं पहिल्या विजयाचा डाव साधला.  

भारताविरुद्धच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकचा दूरावा

१०९०-९१ च्या हंगामात भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण तापले होते. याच पार्श्वभूमीवर भारतात खेळवण्यात आलेल्या आशिया कप स्पर्धेतून  पाकिस्तान क्रिकेट  संघाने माघार घेतली होती.  भारत-श्रीलंका आणि बांगलादेश या तीन देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद पटकावले होते.

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानभारत विरुद्ध श्रीलंकाभारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघ