Nitish Kumar Reddy Take Hat Trick In Syed Mushtaq Ali Trophy 2025 : भारताचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यानं सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत कमालीची गोलंदाजी करुन सर्वांच लक्षवेधून घेतलं आहे. टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यावर नितीश कुमार रेड्डी हा देशांतर्गत टी-२० स्पर्धेत आंध्र प्रदेश संघाकडून मैदानात उतरला. टीम इंडियाकडून खेळताना त्याला गोलंदाजीची पुरेशी संधी मिळाली नव्हती. मात्र मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवून देताना हॅटट्रिकचा डाव साधल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB ला पहिली ट्रॉफी जिंकून देणार कॅप्टनच्या रुपात पूर्ण केली हॅटट्रिक
पुण्याच्या मैदानात रंगलेल्या सुपर लीग अ गाटतील लढतीत रेड्डीनं डावाच्या तिसऱ्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर सलग ३ विकेट्स घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. हर्ष गवली, हरप्रीत सिंह यांच्यानंतर मध्य प्रदेश आणि RCB चा IPL चॅम्पियन कर्णधार रजत पाटीदारच्या रुपात हॅटट्रिक पूर्ण केली. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रेड्डीनं हर्ष गवलीला अवघ्या ५ धावांवर क्लीन बोल्ड केले. पुढचा चेंडूवर त्याने हरप्रीत सिंगला आंध्रचा कर्णधार रिकी भुईकरवी झेलबाद केले. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रेड्डीनं रजत पाटीदारला क्लीन बोल्ड करीत हॅट्ट्रिकचा डाव साधला.
IND vs SA : टी२० च्या आतापर्यंतच्या इतिहासात टीम इंडियावर पहिल्यांदाच आली ही वेळ!
रेड्डीनं हॅट्ट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण...
नितीश कुमार रेड्डीनं घेतलेल्या हॅट्ट्रिकमुळे मध्य प्रदेशची आघाडीची फळी कोलडमली. पण वेंकटेश अय्यर (२२), रिषभ चौहान (४७) आणि राहुल बाथम (३५)* यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशच्या संघाने सामना जिंकला. त्यामुळे रेड्डीनं पुण्याचं मैदान गाजवलं पण संघावर पराभवाची वेळ आल्यामुळे त्याची हॅटट्रिक व्यर्थ ठरली.
आघाडीच्या फळीतील फलंदाजी कोलमडल्यावरही मध्य प्रदेशच्या संघाने मारली बाजी
पुण्यातील अंबी येथील डीवाय पाटील अकादमीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मध्य प्रदेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आंध्र संघ १९.१ षटकात ११२ धावांवर आटोपला. धावांचा पाठलाग करताना नितीश कुमार रेड्डीनं आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावला. पण शेवटी माफक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत मध्य प्रदेशच्या संघाने सामना जिंकून दाखवला.
Web Summary : Nitish Kumar Reddy's hat-trick for Andhra Pradesh in the Syed Mushtaq Ali Trophy went in vain as Madhya Pradesh won the match. Despite Reddy's impressive bowling performance, Madhya Pradesh successfully chased down the target, overshadowing his achievement. Reddy took 3 wickets in an over.
Web Summary : सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में नीतीश कुमार रेड्डी की हैट्रिक बेकार गई क्योंकि मध्य प्रदेश ने मैच जीत लिया। रेड्डी के प्रभावशाली प्रदर्शन के बावजूद, मध्य प्रदेश ने लक्ष्य का पीछा करते हुए जीत हासिल की, जिससे उनका प्रदर्शन फीका पड़ गया। रेड्डी ने एक ओवर में 3 विकेट लिए।