Join us  

मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू अडचणीत; मुंबई पोलीस अन् आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लाकडाऊन जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 5:04 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईतील असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना वारंवार घरीच राहण्याची विनंती करत आहेत. पण, मुंबईचा क्रिकेटपटू अडचणीत सापडला आहे आणि त्यानं मुंबई पोलीस व आदित्य ठाकरे यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव अडचणीत सापडला आहे. त्याच्या पाळीव कुत्र्याची प्रकृती बिघडली आहे आणि त्याला बरे होण्यासाठी लागणारे औषध कुठेही मिळत नाही. त्यानं ही सर्व माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि त्या औषधाचे नाव सांगून मदतीचं आवाहन केले आहे. त्यानं मुंबई पोलीस आणि आदीत्य ठाकरे यांना टॅग करून मदतीची मागणी केली आहे.     2012मध्ये सूर्यकुमार मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला होता. पण, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्डसारखे अनुभवी खेळाडू असल्यानं त्याला संधी मिळाली नाही. 2014मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात गेला. 2015च्या आयपीएलमध्ये त्यानं मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 चेंडूंत 46 धावांची खेळी केली. त्यानं आयपीएलच्या 55 सामन्यांत 612 धावा केल्या आहेत. 2018च्या लिलावत मुंबई इंडियन्सनं त्याला 3.2 कोटींत आपल्या ताफ्यात पुन्हा दाखल करून घेतले.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!

डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज

रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार

 महाराष्ट्राच्या मल्लानं जपली सामाजिक जाण; राहुल आवारेनं केलं 'लाख'मोलाचं दान

सानिया मिर्झानं गरजूंसाठी जमा केले कोट्यवधी; मिताली राजचाही मदतीचा हात

मोठी बातमी; टोक्यो ऑलिम्पिकनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलणार?

IPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार?

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सआदित्य ठाकरे