इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत उर्वरित 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 19 सप्टेंबरला सामना रंगणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या सामने दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येतील. Day matches starts at 3.30 pm and night matches starts at 7.30 pm in IPL 2021
IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण!
आयपीएल 2021 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत. मुंबई इंडियन्सचे दोन सामने दुबईत, दोन शाहजात आणि 3 अबु धाबी येथे होतील.
Mumbai Inidian Matches Schedule :
19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून