Breaking: IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण!

IPL 2021Full Schedule ; इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:04 PM2021-07-25T19:04:55+5:302021-07-25T19:23:46+5:30

whatsapp join usJoin us
BREAKING: MI will take on CSK on September 19 to kickstart the second leg of IPL 2021, know Full Schedule | Breaking: IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण!

Breaking: IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडण्यात येणाऱ्या 31 सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडण्यात येणाऱ्या 31 सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 19 सप्टेंबरला सामना रंगणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे. Day matches starts at 3.30 pm and night matches starts at 7.30 pm in IPL 2021

आयपीएल 2021 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत. 

कोरोनाच्या शिरकाव झाल्यामुळे भारतात सुरू असलेली आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यानंतर या लीगचे उर्वरित 31 सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह येथे खेळवण्याचा निर्णय झाला. 15 ऑक्टोबरला दुबईत अंतिम सामना होणार आहे, तर 10 ऑक्टोबरला पहिला क्वालिफायर, 11 ऑक्टोबरला एलिमिनेटर आणि 13 ऑक्टोबरला दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे.  

Full Schedule
19 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
20 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
21 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
24 सप्टेंबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
25 सप्टेंबर - सनयारझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
26 सप्टेंबर - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
28 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
28 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, सायं. 7.30 वाजल्यापासून
30 सप्टेंबर - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
1 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
2 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
3 ऑक्टोबर - पंजाब किंग्स वि. रॉयल चँलेंजर्स बँगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून
3 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि, चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
6 ऑक्टोबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
7 ऑक्टोबर - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
7 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
10 ऑक्टोबर - क्वालिफायर, सायं. 7.30 वाजल्यापासून
11 ऑक्टोबर - एलिमिनेटर, सायं. 7.30 वाजल्यापासून
13 ऑक्टोबर - क्वालिफायर 2, सायं. 7.30 वाजल्यापासून
15 ऑक्टोबर- फायनल, सायं. 7.30 वाजल्यापासून

 

 

Web Title: BREAKING: MI will take on CSK on September 19 to kickstart the second leg of IPL 2021, know Full Schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.