Join us

WPL Final 2025: मुंबई इंडियन्सनं दिमाखात गाठली फायनल; गुजरात जाएंट्सचा खेळ खल्लास!

याधी २०२३ मध्ये पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 23:14 IST

Open in App

महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने एलिमिनेटरच्या लढतीत गुजरात जाएंट्सला पराभूत करत फायनल गाठली आहे. आता १५ मार्चला मुंबई इंडियन्स महिला संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात खेळताना दिसेल. याधी २०२३ मध्ये पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

२०० पारच्या लढाईत गुजरातचा खेळ १६६ धावांतच खल्लास

एलिमिनेटरच्या लढती पहिल्यांदा फलंदाजी करताना मेथ्यू हेली (Hayley Matthews) आणि नॅटली सायव्हर ब्रंट (Nat Sciver-Brunt) यांनी केलेल्या १३५ धावांच्या भागीदारी आणि हरमनप्रीत कौरच्या १२ चेंडूतील ३६ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २१३ धावा करत गुजरात जाएंट्स संघासमोर २१४ धावांचे टार्गेट दिले होते. या धावांचा पाठलाग करताना गुजरात जाएंट्सचा संघ १९.२ षटकात १६६ धावांतच आटोपला. मुंबई इंडियन्सच्या संघानं ४७ धावांनी विजय मिळवत फायनल गाठली.  

दिल्ली कॅपिटल्ससमोर पुन्हा मुंबई इंडियन्सच चॅलेंज

दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. पण त्यांना अजूनपर्यंत ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०२३ च्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यातच फायनलचा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सनं बाजी मारत पहिल्या ट्रॉफीवर नाव कोरलं. २०२४ च्या दुसऱ्या हंगामातही दिल्ली कॅपिटल्सचा संघ फायनलमध्ये पोहचला. पण गत हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं त्यांना शह दिला. आता पुन्हा दिल्ली कॅपिटल्स महिला संघासमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. हा सामना  मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार असल्यामुळे हरमनप्रीत कौरच्या संघाला दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याची अधिक संधी असेल.

हेली मॅथ्यूजचा गोलंदाजीतही जलवा; गुजरातच्या बॅटर्सचा लागला नाही मेळ

गुजरात जाएंट्स संघाने नाणेफेक जिंकून या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यास्तिका भाटियाच्या रुपात मुंबई इंडियन्स महिला संघानं अवघ्या २६ धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर नॅटली सायव्हर आणि हेली मेथ्यूज जोडी जमली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी करच संघाला मजबूत स्थितीत आणले . हेली मॅथ्यूज ५० चेंडूत बाद झाल्यावर कॅप्टन हरमनप्रीत कौरनं नॅटलीसोबत डाव पुढे नेला. नॅटली ४१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली.  हरमनप्रीत कौरनं १२ चेंडूत तुफान फटकेबाजीसह  ३६ धावा केल्यामुळे मुंबई इंडियन्स महिला संघानं निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात  धावफलकावर २१३ धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या ताफ्यातील एकीलाही मोठी धावसंख्या करता आली नाही. डॅनियेल गिब्सन ३४ (२४), फीबी लिचफिल्ड ३१ (२०) आणि भारती फुलमाली ३० (२०) धावा वगळता कुणालाही मैदानात जम धरता आला नाही. मुंबई इंडियन्सकडून फलंदाजीत तोरा दाखवणाऱ्या मेथ्यू हेलीनं गोलंदाजीतही चमक दाखवत ३ विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय अमेलिया कर हिने २ तर शबनील इस्माइल आणि नॅट ब्रंट या दोघींनी प्रत्येकी एक-एक विकेट टिपली.    

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सहरनमप्रीत कौर