Team India Mumbai Indians Lanka T10 Super League 2024: श्रीलंकेत ११ डिसेंबरपासून लंका टी१० सुपर लीग सुरू होत आहे. ही लीग पहिल्यांदाच श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. या लीगमध्ये १०-१० षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये एकूण ६ संघ खेळताना दिसतील. याचे सर्व सामने कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सहा फ्रँचायझींपैकी एका संघाचा कर्णधार म्हणून भारतीय खेळाडू दिसणार आहे. हा खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणारा सौरभ तिवारी. या भारतीय खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच लहान होती. हा खेळाडू टीम इंडियासाठी फक्त 3 सामने खेळू शकला. पण आता तो शेजारी देशातील एका संघाचा कर्णधार झाला आहे.
![]()
लंका T10 सुपर लीगमध्ये कर्णधार
नुवारा एलिया किंग्स हा लंका T10 सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या सहा संघांपैकी एक आहे. नुवारा एलिया किंग्सने लंका T10 सुपर लीगच्या पहिल्या सत्रासाठी माजी भारतीय खेळाडू सौरभ तिवारीला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. सौरभ तिवारीने या वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. सौरभ तिवारीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ३ सामने खेळले. २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे पदार्पण करणाऱ्या सौरभने त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. ![]() २००८ मध्ये भारतासाठी अंडर१९ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सौरभ तिवारी देखील एक भाग होता. सौरभने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ ४९ धावा केल्या. सौरभ तिवारीने आयपीएलमध्ये एकूण ९३ सामने खेळले. या कालावधीत त्याने १४९४ धावा केल्या.
२००८ मध्ये भारतासाठी अंडर१९ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सौरभ तिवारी देखील एक भाग होता. सौरभने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ ४९ धावा केल्या. सौरभ तिवारीने आयपीएलमध्ये एकूण ९३ सामने खेळले. या कालावधीत त्याने १४९४ धावा केल्या.
 
किंग्स लीगच्या पहिल्याच दिवशी सौरभ तिवारीच्या नेतृत्वाखाली नुवारा इलिया मैदानावर दिसणार आहे. टूर्नामेंटच्या पहिल्या दिवशी चाहत्यांना तिहेरी-हेडर पाहायला मिळतील. पहिला सामना जाफना टायटन्स टूर्नामेंट आणि हंबनटोटा बांगला टायगर्स यांच्यात होणार आहे. यानंतर नुवारा एलिया किंग्जचा सामना कोलंबो जग्वार्सशी होणार आहे. तर, दिवसाच्या शेवटच्या सामन्यात कँडी बोल्ट आणि गॅले मार्व्हल्स यांच्यात सामना होईल.
नुवारा एलिया किंग्स : सौरभ तिवारी (कर्णधार), अविष्का फर्नांडो, कसून रजिथा, दुशान हेमंथा, काइल मेयर्स, बेनी हॉवेल, दानुष्का गुनाथिलका, लाहिरू मदुशंका, आफताब आलम, निमसरा अथरगल्ला, यशोदा लंका, उमर अकमल, विशेंबा, चॅलेम्बा, चॅलेम्बामी करुणारत्ने, पुलिंदू परेरा.