MS Dhoni On Gautam Gambhir After India Win T20 World Cup 2026 : भारताचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला चीअर करताना दिसला होता. भारतीय संघाने न्यूझीलंडला एकतर्फी पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवल्याचा आनंद व्यक्त करण्यासाटी MS धोनी तब्बल ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या खास पोस्टमध्ये धोनीनं माजी सहकारी आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासंदर्भात खास कमेंट केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
MS धोनीची कोच गौतम गंभीरसंदर्भात खास कमेंट
भारतीय संघासह नरेंद्र मोदी स्टेडियमवर गौतम गंभीरच्या नावेही खास विक्रमाची नोंद झाली. खेळाडू आणि कोचच्या रुपात टी-२० वर्ल्ड जिंकणारा तो पहिला क्रिकेटर ठरला. संघासोबतच MS धोनीनं कोच आणि माजी सहकाऱ्याचे कौतुक करताना म्हटले आहे की, कोच साहब...तुमच्या चेहऱ्यावर स्माइल खूप छान दिसते. स्मिथ हास्य आणि मजबूत इरादा हे किलर कॉम्बो वाटते, अशी भावनाही धोनीने व्यक्त केली आहे. त्याची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच गाजताना दिसत आहे. गौतम गंभीर २००७ च्या पहिल्या वहिल्या वर्ल्डकप स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळाले होते. पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यात त्याने ७५ धावांची मॅच विनिंग खेळीही केली होती.
भरमैदानात KISS, मग मांडीवर बसली...; Hardik Pandya - Mahieka Sharma चं 'खुल्लम खुल्ला प्यार'
धोनीचा तो ऑयकॉनिक सिक्सर अन् गंभीरची गाजलेली 'ती' कमेंट
२०११ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही गौतम गंभीर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसला होता. या स्पर्धेत धोनीचा मॅच फिनिशिंग सिक्सरचा क्षण ऑयकॉनिक ठरला होता. या मुद्यावरून गौतम गंभीर याने अनेकदा नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. एका षटकारामुळे वर्ल्ड कप जिंकलेला नाही, तर सर्व खेळाडूंच्या योगदानामुळे भारत वर्ल्ड चॅम्पियन झाला, असे वक्तव्य गंभीरनं अनेकदा केले. या मुद्यावर धोनी आणि गंभीर यांच्यात ३६ चा आकडा असल्याची चर्चाही गाजली. पण धोनीनं त्याच्यासंदर्भातील खास कमेंट करत या गोष्ट फक्त चर्चेचा विषय आहेत, असेच चित्र निर्माण करणारे आहे.
३ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधारांच्या साक्षीनं सूर्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं रचला नवा इतिहास
अहमदाबादच्या मैदानावर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे आणि विक्रमी जेतेपद पटकावले. आतापर्यंत भारतीय संघाला जगजेत्ता करणारे सर्व कर्णधार जगातील सर्वात मोठ्या मैदानातील टीम इंडियाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. एमएस धोनीसह रोहित शर्मा आणि कपिल देव हे देखील स्टेडियमवर उपस्थितीत होते.