या माजी कर्णधारामुळेच एम.एस धोनी झाला मोठा, वीरुचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना सौरव गांगुलीने आपल्या संघात स्थान दिलं होतं. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, युवराज सिंह, जहीर खान या सर्व खेळाडूंची कामगिरी बघून सौरव गांगुलीने त्यांना भारतीय संघात जागा मिळवून दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 09:10 AM2017-10-08T09:10:52+5:302017-10-08T13:23:26+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni got bigger due to Sourav Ganguly's departure | या माजी कर्णधारामुळेच एम.एस धोनी झाला मोठा, वीरुचा गौप्यस्फोट

या माजी कर्णधारामुळेच एम.एस धोनी झाला मोठा, वीरुचा गौप्यस्फोट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनी आणि सौरव गांगुली…भारतीय क्रिकेटचे सर्वात दोन यशस्वी कर्णधार म्हणून ओळख आहे. पण सौरव गांगुलीनं घेतलेल्या त्या एका निर्णयामुळे आज धोनी एवढा यशस्वी असल्याचे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खुलासा केला आहे.  सेहवागनं एक वृत्तवाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. 

राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना सौरव गांगुलीने आपल्या संघात स्थान दिलं होतं. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, युवराज सिंह, जहीर खान या सर्व खेळाडूंची कामगिरी बघून सौरव गांगुलीने त्यांना भारतीय संघात जागा मिळवून दिली होती. भारतीय संघासाठी उपयुक्त ठरणारे खेळाडू हेरुन गांगुलीने त्यांना भारतीय संघात आणलं, यावेळी निवड समितीशी अनेकदा मतभेद झाले, पण गांगुलीने त्याकडे लक्ष दिलं नाही. 

माजी कर्णधार गांगुलीने धोनीला एक मोठा खेळाडू बनवताना स्वतः कसा त्याग केला हे सांगितले. धोनीने वरच्या क्रमांकावर खेळायला यावे म्हणून गांगुलीने स्वतःची जागा धोनीला दिल्याचे सेहवागने यावेळी म्हटलं.  2004 मध्ये धोनीला गांगुलीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघात प्रवेश देण्यात आाल. त्यावेळी आम्ही आमच्या फलंदाजी क्रमवारीत वेगवेगळे प्रयोग करत होतो. आम्ही तेव्हा ठरवलं होत की जर आम्हाला चांगले सलामीवीर मिळाले तर दादा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार. परंतु जर आम्हाला अपयश आले तर आम्ही पीच हिटरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणार होतो. ज्यामुळे धावगती वाढू शकेल. 

गांगुलीने तेव्हा धोनीला तिसऱ्या क्रमांकावर तीन-चार सामन्यात संधी देण्याचे ठरवले. त्यामध्ये धोनीनं पाकिस्तानविरोधात 183 धावांची खेळी केली आणि तो जगामध्ये प्रसिद्ध झाला.  जगात असे खूप कमी कर्णधार आहेत जे स्वतःची जागा दुसऱ्या खेळाडूंना देतात. त्यात दादाने आधी माझ्यासाठी सलामीची जागा तर धोनीसाठी तिसऱ्या क्रमांकाची जागा दिली. जर दादाने तस केलं नसत तर धोनी मोठा खेळाडू बनू शकला नसता. असे सेहवाग म्हणाला. 

सेहवाग पुढे म्हणतो, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली धोनीला फिनिशरची भूमिका मिळाली. एक दोन वेळा तो खराब फटके मारून बाद झाला. त्याला त्यामुळे द्रविडच्या रागाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनतर त्याने पूर्णपणे बदलायचे ठरवले आणि एक चांगला फिनिशर झाला. त्याने युवराज बरोबर अतिशय चांगला भागीदाऱ्या केल्या. . 

भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्वाचा वाटा
फिक्सींग प्रकरणानंतर भारतीय क्रिकेटची डागाळलेली प्रतिमा गांगुलीने आपल्या खेळीने बदलली. यासाठी गांगुलीचा मैदानातला आक्रमक पवित्रा कामी आला होता. अर्जुन रणतुंगाप्रमाणेच सौरव गांगुलीने आपल्या खेळीने, जागतिक क्रिकेट वर्तुळात भारताची दखल घ्यायला भाग पाडलं. नाणेफेकीसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह वॉला वाट बघायला लावणं, लॉर्ड्सच्या गॅलरीतून टी-शर्ट काढत केलेलं सेलिब्रेशन, यामुळे भारताची ओळख एक आक्रमक देश म्हणून बनली.

उपखंडाबाहेर कर्णधार म्हणून फलंदाजीतली कामगिरी
भारतीय उपखंडाबाहेर खेळत असताना कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने ४०.२३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात हेडिंग्लेत इंग्लंडविरुद्ध केलेल्या १२८ धावा आणि ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या १४४ धावा यांचा आवर्जुन उल्लेख करायला हवा. याउलट धोनीची कर्णधार म्हणून भारताबाहेरची कामगिरी ही फार वाखणण्याजोगी नाही. धोनीने ३१.८५ च्या सरासरीने धावा केल्या असून यात एकाही शतकाचा समावेश नाहीये. 

Web Title: MS Dhoni got bigger due to Sourav Ganguly's departure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.