Join us

मोहम्मद शमी कमबॅकसाठी सज्ज, पण कोच गौतम गंभीरसोबतच्या 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन

Mohammad Shami Gautam Gambhir, IND vs ENG T20 : मोहम्मद शमी दुखापतीमुळे तब्बल १४ महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:28 IST

Open in App

Mohammad Shami Gautam Gambhir, IND vs ENG T20 : खराब कामगिरी विसरून आता भारतीय संघ टी२०च्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. त्याचा पहिला सामना २२ जानेवारी रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल. या मालिकेतून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल १४ महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. शमीने पहिल्या सामन्याआधी किट बॅग सोबतचा व्हिडीओ टाकला होता. तसेच, परवापासून होणाऱ्या मालिकेसाठी तो संघासोबत सराव करताना दिसला. पण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासोबतचा त्याचा एक फोटो टेन्शन वाढवणारा आहे.

मोहम्मद शमीचे सराव सत्रामधील काही फोटो सध्या चर्चेत आहेत. केवळ चर्चाच नव्हे तर थेट फोटोच समोर आल्याने अनेक गोष्टींची चिंता वाढली आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे संघाच्या सराव सत्रादरम्यान मोहम्मद शमी पायात गुडघ्याजवळ पट्टी बांधलेला दिसला. तसेच त्याच्या पायाच्या बोटावरही पट्टी बांधलेली दिसली. या सर्व गोष्टी पूर्णपणे तंदुरुस्त खेळाडूचे लक्षण नाहीत असे काही जाणकारांचे मत आहे. याचाच अर्थ तो मालिके दरम्यान कधीही पुन्हा दुखापतग्रस्त होण्याची भीती कायम आहे.

दरम्यान, मोहम्मद शमी जेव्हा जेव्हा पुनरागमन करतो तेव्हा तो शानदार कामगिरी करतो हा इतिहास आहे. इंग्लंड संघाला त्याच्याबाबत सावधगिरी बाळगावी लागणार हे नक्कीच आहे. त्यासोबतच शमीने सोशल मीडियावरून इंग्लंडच्या संघाला इशारा दिलाय. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या किट बॅगमध्ये ठेवलेल्या अनेक शूजची पाहणी करताना दिसला. तो हे शूज साफ करतानाही दिसला. तसेच 'प्रतीक्षा संपली आहे, मॅच मोड चालू झाला आहे आणि मी पुन्हा टीम इंडियामध्ये सामील होण्यास तयार आहे.' असे कॅप्शनही त्याने लिहिले.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५मोहम्मद शामीगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ