Join us  

फक्त IPL नव्हे, तर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडची मेहनत; मायकेल वॉननं केलं कौतुक

भारतीय क्रिकेट संघात मागील चार महिन्यांत जवळपास १० युवा खेळाडूंनी पदार्पण केलं. या सर्वांनी दणक्यात पदार्पण केल्यानं त्यांच्या यशाचे श्रेय आयपीएलला दिले जात आहे. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:33 PM

Open in App

भारतीय क्रिकेट संघात मागील चार महिन्यांत जवळपास १० युवा खेळाडूंनी पदार्पण केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी नटराजन, शुबमन गिल, वॉशिंग्टनं सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांचे कसोटीत पदार्पण झाले. तर इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 व वन डे मालिकेत सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केलं. या सर्वांनी दणक्यात पदार्पण केल्यानं त्यांच्या यशाचे श्रेय आयपीएलला दिले जात आहे. पण, या युवा खेळाडूंच्या यशामागे टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे, असे विधान इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं केलं आहे. ( Michael Vaughan credits Rahul Dravid)  महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम, CSKच्या नव्या जर्सीतून भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट, Video

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि इंग्लंडविरुद्ध अक्षर पटेल, इशान किशन व सूर्यकुमार यांनी पदार्पण करताना दमदार खेळ केला. पुण्यातील वन डे सामन्यात कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पणातच वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले. भारतीय युवा खेळाडूंच्या या यशाचे श्रेय आयपीएलला दिले जात असताना राहुल द्रविडची त्यामागची मेहनतही आहे. त्यामुळेच मायकेल वॉननं भारताच्या माजी खेळाडू आणि भारतीय क्रिकेट सिस्टमचे कौतुक केलं.  पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

तो म्हणाला,''आपण सातत्यानं आयपीएलबाबत बोलतो, परंतु राहुल द्रविडनं  डेव्हलपमेंट प्रेग्रमातून खेळाडूंना मानसिकतेचे योग्य धडे दिले. हे सर्व खेळाडू एका सिस्टममधून जातात आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. अशी सिस्टम बनवण्याचे श्रेय भारताला द्यायला हवं आणि ते त्याची योग्य रितीनं अंमलबजावणी करत आहेत.''

राहुल द्रविडची महत्त्वाची भूमिका१९ वर्षांखालील तसेच भारतीय ‘अ ’संघाची सूत्रे द्रविडने स्वीकारली त्या घटनेला आता सहा वर्षे झाली. पंत आणि वॉशिंग्टन पहिल्या तर शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी. राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ( एनसीए) प्रमुखपद भूषवित आहे. एनसीएत आलेल्या खेळाडूंमध्ये कुठलाही भेदभाव न करता त्यांच्या कर्तृत्वाला तसेच मेहनतीला प्रोत्साहन देणारा राहुल द्रविड पडद्यामागील खरा हिरो आहे. त्याच्यासारख्यांमुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात असल्याची खात्री अनेकांना पटली. Fact Check : भारत-पाकिस्तान यांच्यात २०२१मध्ये ट्वेंटी-20 मालिका होणार; दशकानंतर एकमेकांना भिडणार

द्रविडने नेमके काय केले? आधुनिक तंत्रज्ञान आधारित सराव आणि फिटनेसवर भर दिला. १९ वर्षांखालील प्रत्येक झोनमधील खेळाडूंच्या कामगिरीचा साप्ताहिक प्रगती अहवाल तयार केला. ‘अ’ संघासाठी करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंचा पूल ३० पर्यंत नेला. भारत ‘अ’ संघाचा विदेश दौरा वर्षातून दोनदा होईल, याची सोय केली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा दर्जा सुधारला. विराट कोहलीची मागणी अनिल कुंबळेनं धुडकावली; टीम इंडियाच्या कॅप्टनला धक्का!

खेळाडू शोधले, जडणघडणही केली खेळाडूंमधील कौशल्य विकास, तंत्र आणि शारीरिक फिटनेस सुधारणे या मुद्यांवर भर देण्यात आला. एखादा खेळाडू सरावादरम्यान आठवड्यात किती फटके खेळला. किती चुका झाल्या आदींचा लेखाजोखा द्रविडने ठेवला. त्या खेळाडूच्या चुका सुधारल्या. खेळाडू सामन्यादरम्यान कसा वागतो, याचाही शोध घेत पुढे त्या खेळाडूला अ संघातून खेळविण्याचा प्रयोग केला. मोहम्मद सिराज आणि मयांक अग्रवालसारख्या खेळाडूंना काही वेळा ‘अ’ संघात न खेळवता स्थानिक क्रिकेटचा अनुभव घेण्यास वाव दिला.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडराहूल द्रविडमोहम्मद सिराजशार्दुल ठाकूरसूर्यकुमार अशोक यादवशुभमन गिल