IPL 2021, CSK Jersey : महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम, CSKच्या नव्या जर्सीतून भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट, Video

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी नवी जर्सीचं अनावरण केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:17 AM2021-03-25T11:17:48+5:302021-03-25T11:18:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: MS Dhoni Unveils CSK's 'Tribute to Indian Armed Forces' Jersey; watch Video | IPL 2021, CSK Jersey : महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम, CSKच्या नव्या जर्सीतून भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट, Video

IPL 2021, CSK Jersey : महेंद्रसिंग धोनीचं देशप्रेम, CSKच्या नव्या जर्सीतून भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी नवी जर्सीचं अनावरण केलं. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचा एक खास व्हिडीओ पोस्ट करून CSKनं नवी जर्सी त्यांच्या फॅन्ससमोर आणली. CSKच्या या जर्सीतून भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली आहे. जर्सीच्या दोन्ही खांद्यावर भारतीय सैन्याचे प्रतिक असलेले चिन्ह लावण्यात आले आहे. (tribute to country’s armed forces). महेंद्रसिंग धोनी हा स्वतः मानद लेफ्टनंट कर्नल आहे.  विराट कोहलीची मागणी अनिल कुंबळेनं धुडकावली; टीम इंडियाच्या कॅप्टनला धक्का!



चेन्नई सुपर किंग्सचा संघ २८ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. आयपीएल २०२१मधील त्यांचे सुरुवातीचे पाच सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. सध्या CSKचे सराव शिबिर चेन्नईत सुरू आहे. पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

 चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन Fact Check : भारत-पाकिस्तान यांच्यात २०२१मध्ये ट्वेंटी-20 मालिका होणार; दशकानंतर एकमेकांना भिडणार

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.
 

Web Title: IPL 2021: MS Dhoni Unveils CSK's 'Tribute to Indian Armed Forces' Jersey; watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.