चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी लोकेश राहुलसाठी 'गुड न्यूज'; जाणून घ्या त्यामागची स्टोरी

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लोकेश राहुलला टीम इंडियात संधी मिळणार हे जवळपास पक्के मानले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:03 IST2025-01-15T18:02:49+5:302025-01-15T18:03:30+5:30

whatsapp join usJoin us
Lokesh Rahul got 'good news' before the Champions Trophy; know the story behind it | चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी लोकेश राहुलसाठी 'गुड न्यूज'; जाणून घ्या त्यामागची स्टोरी

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी लोकेश राहुलसाठी 'गुड न्यूज'; जाणून घ्या त्यामागची स्टोरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI Rankings Ahead Champions Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत फार मोठा बदल झालेला नाही. पण लोकेश राहुलसाठी यावेळी गूडन्यूज मिळाली आहे. त्याच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली असून तो आघाडीच्या १० फलंदाजांच्या अगदी जवळ पोहचला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी वनडे क्रमवारीत  झालेला फायदा निश्चितच त्याच्यासाठी आत्मविश्वास उंचावण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टेस्ट अन् टी-२० मध्ये जैसे थे सीन; वनडे रँकिंगमध्ये थोडा बदल

यावेळीच्या आयसीसी रँकिंगमध्ये कसोटी आणि टी-२० क्रमवारीत काहीच बदल झालेला नाही. पण वनडेत मात्र हलका बदल झाल्याचे दिसून येते. भारतीय संघानेही गेल्या काही दिवसांत वनडे सामना खेळलेला नाही. पण न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील एका वनडे सामन्यामुळे क्रमवारीत बदल झाला आहे. यात लोकेश राहुल फायद्यात असल्याचे दिसून येते. 

बाबर आझम टॉपला, त्याच्यापाठोपाठ टॉप ४ मध्ये दिसतात ३ भारतीय फलंदाज 

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम ७९५ रेटिंगसह अव्वल स्थानी कायम आहे. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मा (७४६ रेटिंग पॉइंट्स), शुबमन गिल (७६३ रेटिंग पॉइंट्स) आणि विराट कोहली (७४६ रेटिंग पॉइंट्स) यांचा नंबर लागतो. 

केएल राहुलसाठी फायद्याचा सौदा

आयसीसीच्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत केएल राहुल याने दोन स्थानांनी सुधारणा करत १३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ६४४ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत तो संघाचा भाग असेल तर त्याला टॉप १० मध्ये एन्ट्री मारता येईल. त्याशिवाय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही त्याला क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तो टीम इंडियाच भाग असेल, हे जवळपास निश्चित माननले जात आहे.

श्रेयस अय्यरही टॉप १० च्या अगदी जवळ

टीम इंडियातून आउट झाल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांची बरसात करणारा श्रेयस अय्यर वनडे रँकिंगमध्ये ६५८ रेटिंग पॉइंट्ससह ११ व्या स्थानावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसह इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेत तो मैदानात उतरू शकतो. त्यामुळे त्यालाही येत्या काळात क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी मिळेल.

Web Title: Lokesh Rahul got 'good news' before the Champions Trophy; know the story behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.