Join us

Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

आशिया कप  स्पर्धेसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:21 IST

Open in App

Krunal Pandya Likely Comeback Asia Cup Team India Squad : आयपीएलमधील १७ वर्षांचा दुष्काळ संपवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) संघाने २०२५ च्या १८ व्या हंगामात जेतेपद पटकावले. किंग कोहलीचं एक मोठं स्वप्न साकार करण्यात हार्दिक पांड्याचा भाऊ अन् स्टार अष्टपैलू  क्रुणाल पांड्या याने मोलाचा वाटा उचलला होता. IPL मधील चॅम्पियनवाल्या कामगिरीनंतर त्याच्यासाठी पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे उघडू शकतात. युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी त्याला टीम इंडियात स्थान मिळू शकते. जर गौतम गंभीरनं त्याच्यावर विश्वास टाकला तर तब्बल चार वर्षांनी तो पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आशिया कप  स्पर्धेसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा?

भारताच्या यजमानपदाखाली आयोजित आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने युएईतील दुबई आणि अबूधाबीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. ९ सप्टेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून टी-२० प्रकारात होणाऱ्या स्पर्धेसाठी २१ ते २५ ऑगस्ट या कालावधीत कधीही भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. 

"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

२०२१ पासून टीम इंडियात मिळालेले नाही स्थान

क्रुणाल पांड्या हा २०२१ पासून टीम इंडियातून बाहेर आहे. पण त्यानंतरही तो सातत्याने देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. आरसीबीच्या संघाला जेतेपद मिळवून देताना त्याने आपल्यातील अष्टपैलूत्वाची खास झलक दाखवून दिली होती. त्यामुळेच त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा एकदा खुले होऊ शकतात, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. रियान परागच्या तुलनेत क्रुणाल पांड्या हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.   क्रुणाल पांड्याची IPL मधील कामगिरी 

आयपीएलच्या फायनलमध्ये त्याने ४ षटकात १७ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर तो सामनावीरही ठरला होता. एकंदरीत आयपीएलचा विचार करता २०२५ च्या हंगामात त्याने १५ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या. फलंदाजीत ७ डावात त्याने १०९ धावा करताना त्याने एका डावात नाबाद ७३ धावांची क्लास खेळीही केली होती.  

टॅग्स :एशिया कप 2023क्रुणाल पांड्याहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर