Join us  

रोहित शर्मासाठी कपिल देव यांची खास इन्स्टाग्राम स्टोरी, म्हणाले, "पराभव पचवणं कठीण पण तू..."

सलग १० सामने जिंकल्यावर World Cup Final मध्ये भारताचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 5:51 PM

Open in App

Kapil Dev on Rohit Sharma, World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील भारताच्या पराभवाने भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यातील अश्रू पाहून चाहते भावनिक झाले. याबाबत अनेक यूजर्स आणि सेलिब्रिटींनी लिहिले की- खेळात विजय आणि पराभव दोन्ही असतात, त्यामुळे निराश होऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तशातच 1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार कपिल देव यांनीही या प्रकरणावर इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. ती स्टोरी इंटरनेटवर व्हायरल झाली असून या कथेने भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली.

कपिल देव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा भावनिक फोटो टाकला आणि इंग्रजीत लिहिले की- 'रोहित, तू तुझ्या कामात मास्टर आहेस. पुढे आणखी खूप सारं यश तुझी वाट पाहत आहे. मला माहिती आहे की फायनलमधला पराभव पचवणं तुझ्यासाठी कठीण आहे, परंतु खचून जाऊ नकोस. तरूणांना प्रेरित करत राहा. संपूर्ण भारत देश तुझ्यासोबत आहे.' आता ही गोष्ट इंटरनेटवर पसरली असून, त्यामुळे चाहते कपिल देव यांचेही कौतुक करताना दिसत आहेत.

मायक्रोब्लॉगिंग साइट X वर कपिल देवच्या इंस्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट पोस्ट करत @CricCrazyJohns नावाच्या वापरकर्त्याने लिहिले - कपिल देवची इंस्टाग्राम स्टोरी कॅप्टन रोहित शर्मासाठी. या स्टोरीने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले- आमच्या कॅप्टनला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद कपिल पाजी. दुसरा म्हणाला - स्ट्राँग चॅम्प, भारत तुमच्या सोबत आहे. इतरांनी सांगितले की, रोहित तू अप्रतिम खेळलास.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपकपिल देवरोहित शर्माआॅस्ट्रेलियाभारत