भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम अष्टपैलूपैकी एक अशी ओळख असलेल्या कपिल देव यांनी आधुनिक जमान्यातील क्रिकेटमधील प्रशिक्षणाच्या मुद्यावर भाष्य करताना गौतम गंभीरला मॅनेजरचा टॅग लावला आहे. गौतम गंभीरला प्रशिक्षक नव्हे तर संघ व्यवस्थापक म्हणावे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे. कपिल पाजी नेमकं काय म्हणाले आहेत? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गंभीर कोच नव्हे मॅनेजर! नेमकं काय म्हणाले कपिल देव?
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या हस्ते आयोजित आयसीसी शताब्दी सत्रातील खास कार्यक्रमात कपिल देव म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना आता पारंपरिक प्रशिक्षणाची गरज उरलेली नाही. सध्याच्या घडीला ‘कोच’ हा शब्द फारच सर्वसाधारण झाला आहे. गौतम गंभीर कोच असू शकत नाही; तो संघाचा व्यवस्थापक (Team Manager) मॅनेजर असू शकतो.
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
कोच कसा असतो हे सांगत गंभीरसंदर्भात उपस्थितीत केला प्रश्न
कपिल देव पुढे म्हणाले की, शाळा–कॉलेजमध्ये ज्यांच्याकडून आपण शिकतो ते खरे प्रशिक्षक असतात. ते आपल्याला घडवतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. इथं प्रशिक्षकाची भूमिकाच नसते. आपले हे विधान भक्कम करण्यासाठी त्यांनी गौतम गंभीर अत्यंत तज्ज्ञ खेळाडूंना अर्थात फिरकीपटू आणि लेग स्पिनरला कोचिंग देऊ शकेल का? असा प्रश्नही उपस्थितीत केला.
सेंच्युरी मारणाऱ्या सहकाऱ्यासमोबत पार्टी करण्यापेक्षा...
कपिल देव यांनी स्वत:च्या कर्णधारपदाच्या अनुभावाचा दाखला देताना संघाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूकडून काय अपेक्षित आहे, यासंदर्भातील मतही व्यक्त केले. ज्यावेळी मी संघाचे नेतृत्व करत होतो, त्यावेळी शतक झळकवणाऱ्या खेळाडूसोबत पार्टी करण्याऐवजी खराब कामगिरी करणाऱ्या सहकाऱ्याशी संवाद साधण्याला प्राधान्य द्यायचो. या छोट्या छोट्या गोष्टी खेळाडूंच्या आत्मविश्वास उंचावण्यास मदत करतात. स्वत:च्या कामगिरीपुरता विचार न करता संघाला एकत्र ठेवणं आणि प्रत्येकाचा आत्मविश्वाच देणं ही कर्णधाराची जबाबदारी असते, असे ते म्हणाले आहेत.