Australia Playing XI for Gabba, IND vs AUS 3rd Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (१४ डिसेंबर) ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. पॅट कमिन्सने (Pat Cummins) प्लेइंग 11 मध्ये एक बदल केला आहे. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभवा झाला होता. त्यानंतर, जोश हेझलवूडला ( Josh Hazlewood ) स्नायूंच्या ताणामुळे अडलेडमधील गुलाबी चेंडूच्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. त्याजागी स्कॉट बोलंड ( Scott Boland ) संघात आला होता. पण तिसऱ्या कसोटी जोश हेजलवूड पुन्हा एकदा खेळताना दिसणार असून, स्कॉट बोलंडला बाहेर बसावे लागणार आहे.
दमदार कामगिरी करूनही बोलंडला वगळणार!
जोश हेझलवूड गाबा कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग 11 मध्ये परतला आहे. स्कॉट बोलँडला वगळण्यात आले आहे. ५ सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी १-१ अशी बरोबरीत आहे. पर्थ कसोटीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन करत पिंक बॉल कसोटी १० गडी राखून जिंकली. स्कॉट बोलंडने अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात ३ बळी घेतले होते. तसे असूनही त्याला तिसऱ्या कसोटीत संधी मिळणार नाहीये.
पर्थमध्ये हेझलवूडने केली होती शानदार गोलंदाजी
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत जोश हेझलवूडने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १ बळी घेतला होता. भारताने पहिली कसोटी २९५ धावांनी जिंकली होती. तिसऱ्या कसोटीसाठी हेजलवूडने एका आठवड्यात दोन फिटनेस टेस्ट दिल्या. तसेच गुरुवारी ॲलन बॉर्डर फील्डवर गोलंदाजी प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरीच्या नेतृत्वाखाली पूर्ण रन अप घेऊन गोलंदाजीही केली.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11
नॅथन मॅकस्विनी, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, अलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.
भारतीय संघ करु शकतो २ बदल
भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये २ बदल करू शकतो. रविचंद्रन अश्विनच्या जागी रवींद्र जाडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. याशिवाय हर्षित राणाच्या जागी आकाशदीपला संधी मिळू शकते. रोहित शर्माने गुरुवारी (१२ डिसेंबर) सराव सत्रात नवीन चेंडूचा सामना केला. अशा स्थितीत तो देखील सलामीला खेळताना दिसू शकतो.
Web Title: Josh Hazlewood Scott Boland Pat Cummins announces Australia playing XI Gabba Test against India IND vs AUS 3rd Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.