Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारतासाठी 'डोकेदुखी' ठरणारा खेळाडू स्पर्धेतून OUT

Star Australian Cricketer Ruled Out, T20 World Cup 2026: बदली खेळाडूबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:46 IST

Open in App

Josh hazlewood Ruled Out, T20 World Cup 2026: टी२० विश्वचषक सुरू होण्याला अवघे काही दिवस उरले असताना ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड दुखापतीतून वेळेत सावरू न शकल्याने या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

हेजलवूड स्पर्धेबाहेर का?

हेझलवूड गेल्या काही काळापासून 'हॅमस्ट्रिंग' (Hamstring) आणि 'अकिलीस' (Achilles) दुखापतीशी झुंज देत होता. तो सुपर-८ फेरीपर्यंत फिट होईल, अशी आशा ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांना होती. मात्र ताज्या वैद्यकीय अहवालानुसार त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. ऑस्ट्रेलियन निवडकर्ते टोनी डोडेमेड यांनी स्पष्ट केले की, आम्हाला आशा होती की जॉश सुपर-८ पर्यंत पुनरागमन करेल, पण आता त्याला घाईघाईत मैदानात उतरवणे खूप जोखमीचे ठरेल.

दोन प्रमुख गोलंदाज बाहेर

जोश हेझलवूडच्या आधी ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स देखील पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. मिचेल स्टार्कने आधीच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे २०११ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया गोलंदाजीतील 'बिग थ्री' (स्टार्क, कमिन्स, हेझलवूड) जोडीशिवाय स्पर्धेत उतरणार आहे.

बदली खेळाडूचे काय?

ऑस्ट्रेलियाने अद्याप हेझलवूडच्या जागी कोणत्याही अधिकृत बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. मात्र, अनुभवी सीन ॲबॉट (Sean Abbott) हा ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून संघासोबत आधीच उपस्थित आहे. तसेच, नॅथन एलिस, टिम डेव्हिड आणि ॲडम झॅम्पा यांच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह होते, पण ते पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचे आव्हान

मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ ११ फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत आता झेवियर बार्टलेट, बेन ड्वार्शुइस आणि नॅथन एलिस यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल. यांच्याकडून जास्तीत जास्त चांगली कामगिरी करून घेणे हे ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे कसब असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Australia's Hazlewood Out of T20 World Cup; Blow to Team

Web Summary : Australia faces a setback as Josh Hazlewood is ruled out of the T20 World Cup due to injury. This absence, coupled with other key bowlers missing, weakens their bowling attack. Sean Abbott is a possible replacement.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६सूर्यकुमार यादवभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ