Join us

"तू जवळ असलास की..."; Jasprit Bumrah साठी पत्नी Sanjana Ganesan ने लिहिली रोमँटिक फोटो पोस्ट

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding Anniversary Romantic Message: बुमराह आणि संजना गणेसन यांच्या लग्नाला आज ४ वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 11:30 IST

Open in App

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Romantic Message: भारतीय संघाचा आघाडीचा वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या क्रिकेटपासून काही काळ दूर आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली. पण शेवटच्या सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. तो अद्यापही तंदुरुस्त होऊ शकलेला नाही. म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याचा समावेश नव्हता. असे असताना बुमराह IPL साठी लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, सध्या मिळालेल्या माहितीनुसार, बुमराह IPL च्या पहिल्या काही सामन्यांना मुकणार आहे. एप्रिलमध्ये तो मैदानात उतरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. क्रिकेटच्या पिचवर बुमराह शांत असला तरीही प्रेमाच्या पिचवर बुमराहला त्याच्या पत्नीची यथोचित साथ मिळत आहे. ( Wedding Anniversary Insta Post )

आज बुमराह आणि संजना गणेसन यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली. १५ मार्च २०२१ ला हे दोघे विवाहबद्ध झाले होते. त्यानिमित्ताने संजनाने आज एक खास पोस्ट केली आहे. माही चित्रपटातील बॉलिवूड चित्रपटाचे गाण्यातील चार ओळी कॅप्शनमध्ये लिहून तिने अतिशय रोमँटिक पोस्ट केली आहे. "माझं हृदय केवळ तुझ्यासाठीच सुरु आहे, तुझ्यामुळेच मी श्वास घेतेय, तू नसशील तर घरात मन लागत नाही आणि तू जवळ असलास की कसलीच भीती वाटत नाही" अशा आशयाचा संदेश लिहून तिने बुमराहला लग्नाच्या ४थ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दोघांचा एक रोमँटिक फोटोही पोस्ट केलाय.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसनची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. त्यावेळी संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती. असे बोलले जाते की या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली, परंतु त्यानंतर बराच वेळ त्यांच्यात बोलणे झाले नाही. संजना आणि जसप्रीतची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. या दोघांनी बरेच दिवस आपले नाते मीडियापासून दूर ठेवले होते. २०२१ मध्ये जेव्हा जसप्रीत बुमराहला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली, तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी पहिल्यांदाच समोर आली. लग्नाआधी जसप्रीत आणि संजना दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. मग या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात लग्न केले. या दाम्पत्याला अंगद नावाचा एक छोटा मुलगा आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशनमुंबई इंडियन्सलग्नइन्स्टाग्राम