भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर लग्न बंधनात अडकला. स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिच्यासोबत त्यानं सोमवारी लग्नगाठ बांधली. जसप्रीतच्या लग्नाला फक्त २० पाहुण्यांना उपस्थिती होती आणि त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आलेली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या आधी जसप्रीतनं सुट्टी मागितली होती आणि त्यामागे लग्न हे कारण असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर त्या खऱ्या ठरल्या. यानंतर अमूलनं जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. अमूलनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि संजना या दोघांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. तसंच यासोबत अमूलनं जस को प्रीत मिल गयी असा सुंदर संदेश लिहित त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : 'जस' को 'प्रीत' मिल गयी; Amul नं बुमराहला दिल्या अनोख्या शुभेच्छा
Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : 'जस' को 'प्रीत' मिल गयी; Amul नं बुमराहला दिल्या अनोख्या शुभेच्छा
Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : बुमराहनं फोटो शेअर करत दिली लग्नाची माहिती, पाहा अमूलनं कशा दिला भन्नाट शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:19 IST
Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : 'जस' को 'प्रीत' मिल गयी; Amul नं बुमराहला दिल्या अनोख्या शुभेच्छा
ठळक मुद्देजसप्रीत बुमराह अडकला विवाहबंधनातसोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती