रणजी करंडक स्पर्धेतील २५-२६ च्या हंगामात जम्मू काश्मीरचा संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. कर्नाटक विरुद्धच्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीर संघाने मजबूत पकड मिळवली आहे. संघाच्या दमदार कामगिरीत जलगती गोलंदाज आकिब नबी डार (Aaqib Nabi Dar) याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अंतिम सामन्यात पहिल्या डावात पाच विकेट्सचा डाव साधत त्याने यंदाच्या हंगामात सातव्यांदा 'पंजा' मारला आहे. २९ वर्षीय गोलंदाजाने यंदाच्या हंगामात ६० विकेट्स घेतल्या आहेत. रणजीच्या एका हंगामात एवढ्या विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सौरव गांगुलीनं दिली दाद, थेट अजित आगरकरांकडे केली टीम इंडियात घेण्याची मागणी
आकिब नबी डार याच्या लक्षवेधी कामगिरीने भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली प्रभावित झाला आहे. त्याची भारतीय संघात निवड व्हायला हवी, असे ट्विट सौरव गांगुलीनं केले आहे. या ट्विटमध्ये गांगुलीनं थेट बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांना टॅगही केले आहे.
Hardik Pandya: भर मैदानात हार्दिकनं गर्लफ्रेंड माहिकासाठी असं काही केलं की...; रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद!
जम्मू काश्मीरसाठी गोलंदाजीत ठरला हिरो
हुबळी येथे कर्नाटकविरुद्ध झालेल्या रणजी अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात ५८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्नाटकचा डाव २९३ धावांत आटोपला. या डावात नबीने २३ षटके गोलंदाजी करताना अर्धा संघ तंबूत धाडला. त्याने घेतलेल्या विकेट्समध्ये केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि करुण नायर यांच्या विकेट्सचा समावेश आहे.
ऐतिहासिक कामगिरी
रणजी करंडक स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात एका हंगामात ६० बळी घेणारा नबी फक्त तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. या हंगामात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ७ वेळा पाच बळी घेतले असून, रणजी कारकिर्दीत १५ वेळा एका डावात पाच किंवा अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
आयपीएल आणि टीम इंडियाकडे वाटचाल
इंडियन प्रिमीयर लीगच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या गोलंदाजासाठी ८.४ कोटी रुपये मोजले होते. रणजीतील कामगिरीनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला आगामी IPL हंगामात त्याच्याकडून मोठी आस असेल. आगामी श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठीही तो भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मजबूत दावेदार मानला जात आहे.