Zimbabwe Become 7th Team To Get A Ticket To The Super 8s T20 World Cup 2026 : श्रीलंकेतील पल्लेकेले;d/e मैदानातील झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे अखेर रद्द करण्याची वेळ आली. सामना रद्द झाल्याची घोषणा होताच टॉसला न येता झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ चा बॉस ठरला. हा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. त्यामुळे ५ गुणासह झिम्बाब्वेनं सुपर ८ मध्ये एन्ट्री मारली. दुसऱ्या बाजूला आयर्लंडसह ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यंदाच्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ मध्ये पोहचणारा झिम्बाब्वे हा सातवा संघ ठरला आहे. याआधी वेस्ट इंडिज, भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. आता फक्त भारताच्या गटातून म्हणजे 'अ' गटातून एक संघ निश्चित होणं बाकी आहे. पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यातील लढतीनंतर सुपर ८ मधील शेवटचा संघ मिळणार आहे.
NZ vs CAN : युवराजचं विक्रमी शतक व्यर्थ! फिलिप्स-रचिनची फिफ्टी; न्यूझीलंडही Super 8 साठी नटली
कसा आहे झिम्बाब्वेचा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील रेकॉर्ड
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या हंगामात झिम्बाब्बेचा संघ सातव्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. याआधी २००७, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०२२ या हंगामात झिम्बाब्वेच्या संघाने पात्रता सिद्ध केली होती. यात पहिल्या दोन हंगामात साखळी फेरीत गारद झालेल्या झिम्बाब्बेच्या संघाने त्यानंतर चार वेळा पुढच्या फेरीत मजल मारली. पण आतापर्यंत एकदाही त्यांना सेमीफायनलमध्ये धडक मारता आलेली नाही. गत हंगामात पात्रताही सिद्ध करू न शकलेल्या झिम्बाब्बेच्या संघाने यंदाच्या हंगामाआधी ३४ सामन्यात फक्त ११ विजयाची नोंद केली होती. यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीसह त्यांनी नवा इतिहास रचण्याचे संकेत दिले आहेत.
ऑस्ट्रेलियावर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
झिम्बाब्वेचा संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नियमित सहभागी नसणाऱ्या संघांपैकी एक आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात धमाकेदार कामगिरी करून दाखवत सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. दुसरीकडे २०२१ चा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघावर दुसऱ्यांदा साखळी फेरीत गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. याआधी २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता.