IPL 2026 Fan Parks: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2026 च्या पहिल्या टप्प्यासाठी फॅन पार्कची घोषणा केली आहे. या फॅन पार्कमध्ये प्रेक्षकांना तिकीटाशिवाय स्टेडियमसारखा लाईव्ह मॅचचा अनुभव घेता येणार आहे. यावर्षी देशातील 11 राज्यांमधील 15 शहरांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, फॅन पार्क तीन वेगवेगळ्या वीकेंडमध्ये आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक वीकेंडमध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये प्रत्येकी पाच फॅन पार्क आयोजित केले जातील.
फॅन पार्क खालील तारखांना आयोजित केले जाणार आहेत:
पहिला आठवडा: 28 आणि 29 मार्च 2026
दुसरा आठवडा: 4 आणि 5 एप्रिल 2026
तिसरा आठवडा: 11 आणि 12 एप्रिल 2026
पहिला आठवडा – फॅन पार्क शहरांची यादी
- रोहतक, हरियाणा – छोटू राम पॉलिटेक्निक ग्राउंड
- भोपाळ, मध्य प्रदेश – शासकीय एमव्हीएम कॉलेज मैदान
- नागपूर, महाराष्ट्र – मेकोसाबाग मेथोडिस्ट हायस्कूल मैदान
- तुमकुरू, कर्नाटक – शासकीय ज्युनिअर कॉलेज मैदान
- कृष्णानगर, पश्चिम बंगाल – डीएल रॉय स्टेडियम
दुसरा आठवडा – फॅन पार्क शहरांची यादी
- मथुरा, उत्तर प्रदेश – अमरनाथ विद्या आश्रम
- जोधपूर, राजस्थान – बरकतुल्लाह खान स्टेडियम
- निजामाबाद, तेलंगणा – महिला शैक्षणिक सोसायटी मैदान
- मैसूर, कर्नाटक – एसबीआरआर महाजन फर्स्ट ग्रेड कॉलेज
- भुवनेश्वर, ओडिशा – किट्स युनिव्हर्सिटी स्टेडियम
तिसरा आठवडा – फॅन पार्क शहरांची यादी
- मेरठ, उत्तर प्रदेश – भैंसाली मैदान
- नडियाद, गुजरात – राधे फार्म
- रत्नागिरी, महाराष्ट्र – स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल
- कोयंबटूर, तामिळनाडू – हिंदुस्तान कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स
- राउरकेला, ओडिशा – सेक्टर 17 ग्राउंड
- फॅन पार्कमध्ये काय असणार?
फॅन पार्कमध्ये फक्त लाईव्ह मॅच स्क्रीनिंगच नाही तर अनेक मनोरंजनात्मक उपक्रमही असणार आहेत.
मुख्य सुविधा:
- लाईव्ह मॅच स्क्रीनिंग
- म्युझिक आणि मनोरंजन कार्यक्रम
- फूड कोर्ट
- मुलांसाठी खेळाचे क्षेत्र
- व्हर्च्युअल बॅटिंग अनुभव
- बॉलिंग नेट
- फेस पेंटिंग
- चीअर-ओ-मीटर
- 360° फोटो बूथ
यामुळे प्रेक्षकांना स्टेडियमसारखा अनुभव मिळणार आहे.
फॅन पार्कची सुरुवात कधी झाली?
आयपीएल फॅन पार्क उपक्रमाची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. या उपक्रमामुळे आयपीएलचा उत्साह आणि रोमांच देशातील विविध शहरांतील चाहत्यांपर्यंत पोहोचला. 2026 च्या हंगामातही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ज्या शहरांमध्ये आयपीएल सामने होत नाहीत, तेथील चाहत्यांनाही आयपीएलचा आनंद घेता येणार आहे.