दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील १९ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवरील सान्यात मुंबई इंडियन्सवर कर्णधार बदलण्याची वेळ आली. नियमित कर्णधार हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव टॉसला मैदानात उतरला. जाणून घेऊयात काय आहे त्यामागचं कारण?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पांड्याशिवाय मैदानात उतरली MI; सूर्यानं सांगितलं त्यामागचं कारण
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव नाणेफेकीला आला. त्याच्यासमोर अक्षर पटेलनं नाणेफेकीचा कौल जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसवेळी सूर्यकुमारने सांगितले की, हार्दिक पांड्या आजारी असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. आज त्याच्या जागी मी नेतृत्व करत आहे. संघात सकारात्मकता आहे. आम्हाला आधी फलंदाजी करायची होती. पिच चांगली दिसतेय. दीपक चाहर, बॉश आणि सँटनर यांच्यासह मैदानात उतरत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
अक्षर पटेलनं धावांचा पाठलाग करण्याला दिली पसंती
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, “मी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावरचा हा पहिला सामना आहे, त्यामुळे पिच कशी आहे ते पाहायचं आहे. विकेट थोडी कोरडी आणि कठीण वाटते. मागील सामन्यात आम्ही धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे संघात आत्मविश्वास आहे. वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले तरी खालच्या क्रमांकावरचे खेळाडू योगदान देऊ शकतात. घरच्या मैदानावर खेळणे नेहमीच फायदेशीर असते आणि आमचे चाहते आम्हाला साथ देतील. आम्ही तोच संघ कायम ठेवला आहे.